भाजपाचे प्रदेशाध्यक्ष उद्या परभणी दौर्यावर
परभणी,दि.12(प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी (दि.13 डिसेंबर) संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीकोनातून परभणीच्या दौर्यावर दाखल होणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या महानगर जिल्हा शाखेचे अध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारल्या पाठोपाठ संपूर्ण राज्यात संघटनात्मक बांधणी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ द्यावे, या दृष्टीकोनातून दौरे सुरु केले आहेत. या मालिकेतून ते मंगळवारी परभणीच्या दौर्यावर दाखल होणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे आपल्या या दौर्यात सकाळी परभणीत दाखल होणार असून ते समन्वय समितीच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. तेथून पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पाठोपाठ सकाळी 11 वाजता बावनकुळे हे शनिवार बाजारापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, बसस्थानक ते ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानापर्यंत आयोजित केलेल्या बाईक रॅलीत सहभागी होणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख, मंडळ कार्यकारणी व भाजप कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण व बैठक होणार असून त्यातून संघटनात्मक बांधणीसंदर्भात विचार विनिमय होणार आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे 18 वर्षांवरील नवीन मतदार नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने दोन मतदारांकडून फॉर्म भरुन घेणार आहेत. जिंतूर रस्त्यावरील रायगड कॉर्नरजवळ बावनकुळे यांच्याहस्ते युवा वॉरिअर्स शाखेचे उद्घाटन, तसेच बोरी (ता. जिंतूर) या ठिकाणी �धन्यवाद मोदीजी� या अभियानाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे लाभार्थ्यांची भेट घेणार आहेत. त्यांच्याकडू पत्र लिहून घेणार आहेत. आमदार सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात नमो महिला बचतगट कार्यालयाचे उद्घाटन बावनकुळे यांच्याहस्ते होणार असून ते परभणी शहरातील बुथ नं. 257 वरील 30 प्लस 1 बुथ कार्यकर्त्यांच्या टीमची बैठक घेणार आहेत.
शहरातील नाभिक, परीट व मातंग समाजातील बांधवांशी बावनकुळे हे संवाद साधणार असून शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात �फे्रन्डस ऑफ बीजेपी� या संवाद कार्यक्रमात ते भाजप विचाराशी सहमत असणार्या डॉक्टर्स, सीए, वकील, प्राध्यापक, शिक्षक, व्यापारी यांच्याबरोबर संवाद साधणार आहेत. औद्योगिक वसाहतीतील फन पार्क या ठिकाणी जिल्हा कोअर कमिटी मंडळ अध्यक्ष, सोशल मिडीयाच्या पदाधिकार्यांबरोबर ते बैठक घेणार आहेत.
या एक दिवशीय दौर्यातील भरगच्च कार्यक्रमाच्या दृष्टीकोनातून महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जि्आल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी यशस्वीतेकरीता प्रयत्नशिल आहेत. दरम्यान, माजी आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष कदम, जिल्हाध्यक्ष भरोसे, व्यंकटराव तांदळे, बाबासाहेब जामगे, अनंता बनसोडे, सखाराम दुधाटे, महेंद्र धबाले आदींनी शनिवारी (दि.10) या दौर्याच्या दृष्टीकोनातून सभा स्थळांची पाहणी केली.