भाजप नेते जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे म्हणाले हे माझ्या विरुद्ध बदनामी चे षडयंत्र……
त्या महिलेचा माझा काहीही संबंध नाही
आमदार रत्नाकर गुट्टे यांचेच षडयंत्र-मुरकुटे
परभणी
विशेष
भारतीय जनता पक्षाचे परभणीचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी आज आपल्या विरुद्ध जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला आहे…. राजकीय जीवनातून कायमचे उठवण्याचा हा प्रयत्न असून आपण त्याला कधीही बळी पडणार नाही असे त्यांनी खणखणीतपणे सांगितले कोणत्याही महिलेची आपले संबंध नाहीत आपण कोणालाही वचन किंवा आश्वासन दिले नाही राजकीय जीवनात आपण पथ्य पाळत असून केवळ बदनाम करण्याच्या हेतूने नाहक यात गोवले जात असल्याचा गंभीर आरोप संतोष मुरकुटे यांनी केले आहे
आपल्यासोबत विवाह करतो असे अमिष दाखवून संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप एका महिलेने भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्यावर केला असून यासंदर्भात संबंधित महिलेने रविवारी (दि.22) परभणी येवून जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. दरम्यान हे सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण श्री. मुरकुटे यांनी आज सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. यामागे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे षडयंंत्र असून त्यांनीच आपल्याला कौटुंंबिक व राजकीय जीवनातून उठवण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा आरोप मुरकुटे यांनी केला.
परभणी येथे पत्रकार परिषद घेवून श्री. मुरकुटे यांनी संबधित महिलेच्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मोहन फड, रामप्रभु मुंडे, विलास बाबर, व्यंकटराव तांदळे, विठ्ठलराव रबदडे, रंगनाथ सोळंके आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
संबंधित महिलेने सुरुवातीला 15 जुलै 2023 या दिवशी नौपाडा, ठाणे (पश्चिम) पोलिस ठाण्यात मुरकुटे यांंच्याविरूध्द सर्वप्रथम तक्रार दिली होती. आपण कल्याण (जिल्हा ठाणे) येथे राहत असून व्यवसायाने कंत्राटदार असलेल्या मुरकुटे यांच्याशी 2018 मध्ये आपली ओळख झाली होती. चांगल्या ठिकाणी नोकरीची संधी देवून भविष्यात लग्न करतो असे अमिष दाखवून आपल्याशी मुरकुटे यांनी संबंध ठेवले असे या महिलेने तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर आज पुन्हा येथील जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे संबंधित महिलेने लेखी तक्रार दिली. आपण नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तुम्ही परभणी येथे फिर्याद द्या असे सांगण्यात आले असे म्हणत संबंधित महिलेने आज येथे अर्ज दाखल केला. या अर्जासोबत संबंधित महिलेने मोबाईलवरील चॅटींगचे काही ‘स्क्रीनशॉट’ जोेडले आहेत.
या अनुषंगाने आज मुरकुटे यांनी पत्रकार बैठकीत स्वतःची बाजू स्पष्ट करत हा आपल्याला राजकीय आयुष्यातून उठवण्याचा डाव असून यामागे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे हे असल्याचा आरोप केला. आपल्याला त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष होवू द्यायचे नव्हते. तसेच भविष्यात विधानसभेचे उमेदवार म्हणून आपण त्यांचे प्रतिस्पर्धी असल्याने आमदार गुट्टे यांनीच आपल्या विरोधात संबंधित महिलेला फिर्याद द्यायला लावली असे मुरकुटे म्हणाले.