गंगाखेडमुख्य बातमी

कॅन्सर पीडित पक्षकारासाठी न्यायाधीश पोहोचले न्यायालयाच्या प्रांगणात

परभणी येथील गंगाखेड न्यायालयात एका कुटुंबाचा शेत जमिनीच्या वादातून सुनावणी सुरु आहे. कॅन्सर पीडित महिला पक्षकाराची बाजू ऐकण्यासाठी खुद्द न्यायाधीशच न्यायालयाच्या पायऱ्या उतरून प्रांगणात पोहोचल्याचे ३ मार्च रविवार रोजी गंगाखेड अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजीत लोक अदालतीप्रसंगी पाहावयास मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड तालुक्यातील ढेबेवाडी येथील किशन गंगाराम फड व त्यांच्या भावांमध्ये शेत जमिनीच्या वाटणी पत्रावरून गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबिक वाद निर्माण झाले होते. या प्रकरणी किशन गंगाराम फड यांनी गंगाखेड येथील दिवाणी न्यायालयात ग्यानबा गंगाराम फड, भारतीबाई ग्यानबा फड, आश्रोबा गंगाराम फड व ज्ञानेश्वरी भ्र. किशन फड यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता.

न्यायालयात दाखल कौटुंबिक वादाचे हे प्रकरण गंगाखेड तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने ३ मार्च रविवार रोजी आयोजीत केलेल्या लोक अदालतीत न्यायाधीश एन. डी. रुद्रभाटे यांच्यासमोर ठेवण्यात आले. यातील वादी, प्रतिवादीची पुकार झाल्यानंतर या प्रकरणातील एक प्रतिवादी ज्ञानेश्वरी भ्र. किशन फड यांना कॅन्सर झाल्याने त्या न्यायालय इमारतीच्या पायऱ्या चढून वर येऊ शकत नाहीत. यामुळे त्या इमारतीच्या प्रवेशद्वारावरच थांबल्याचे न्यायधीश एन. डी.रुद्रभाटे यांना समजल्याने त्यांनी न्यायालय इमारतीच्याखाली प्रांगणात येऊन कॅन्सर पिडीत ज्ञानेश्वरी भ्र. किशन फड यांच्यासह वादी, प्रतिवादीचे म्हणणे ऐकून घेत ताडजोडीअंती हे प्रकरण निकाली काढल्याने न्यायालयच आपल्या दारी याची प्रचिती उपस्थितांना आली.

Advertisements
Advertisements

या सुनावणी प्रसंगी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, पॅनल विधिज्ञ अॅड. शैलेश तुपकर, वकील संघाचे अध्यक्ष अॅड.विवेक निळेकर, सहायक अधिक्षक अमृत कदम, विधी सेवा समितीचे सचिन भालेराव, अॅड. कांगणे, अॅड. मिलिंद क्षीरसागर, अॅड. केंद्रे, अॅड. संतोष मुंडे, अॅड. संदीप पाठक आदी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button