महाराष्ट्रावर लागलेला गद्दारीचा कलंक परभणी लोकसभेतील सुजाण मतदार धुवून काढणार,खासदार जाधव
परभणी
विशेष
हनुमंत चिटणीस
परभणी लोकसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार बंडू जाधव यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या कृपेने आणि हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने माझी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा परभणी लोकसभेचा उमेदवार म्हणून सलग तिसऱ्यांदा घोषणा झाली आहे.
मधल्या काळात महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतरे आपण पाहिली. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या झंजावाताला घाबरून जाऊन तुमच्या-माझ्या शिवसेनेला कमजोर करण्याचा जो प्रयत्न झाला, तो आपण पाहिलाच आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आपला हा मतदारसंघ ओळखला जातो.
जी ताकद आणि विश्वास तुम्ही मागील तीन दशकांपासून शिवसेनेच्या पाठीशी उभा केला, त्याला सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे. लढाई मोठ्या जिकिरीची आहे. आपण हाती धरलेला निष्ठेचा आणि स्वाभिमानाचा भगवा पुन्हा एकदा दिल्लीवर फडकवायचा आहे. त्यासाठी तुमची साथ आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत.
महाराष्ट्रावर लागलेला गद्दारीचा कलंक परभणी लोकसभेतील सुजाण मतदार धुवून काढणारच आहे! यापुढील काळातही जिल्ह्याच्या प्रगतीसाठी, तुमच्या न्याय हक्कांसाठी झुंजार लढा देण्याची ताकद मला आपणा सर्वांच्या रूपाने मिळेल, हा विश्वास व्यक्त करतो.
संजय उर्फ बंडू जाधव.
अधिकृत उमेदवार – परभणी लोकसभा मतदारसंघ
(शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)