क्राईममराठवाड़ामुख्य बातमी

धोंड्याच्या महिन्यात सासरा आणि मेहुण्याने मिळून जावयाची केली हत्या

जालना:  धोंड्याचा महिना चालू आहे. चालीरीतीमुळे या महिन्यात लेक जावयाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. पण, या अधिकाच्या महिन्यातच मेव्हणे आणि सासऱ्याने आपल्या जावयाचा खून केल्याने जालना जिल्ह्यातील परतूर शहरात खळबळ उडाली आहे. शेतीच्या पाण्यावरील वादातून या आधिकाच्या महिन्यात जावयाची हत्या करण्यात आली आहे.

कृष्णा धोंगडे (वय ४०) असे मृताचे नाव असून त्यांची शहरातील सेलू रोडवर औषधाची दुकान आहे. धोंगडे आणि त्यांचे सासरे संशयित नरहरी रोकडे, मेहुणा पांडुरंग रोकडे, पवन रोकडे यांच्यात शेतातील पाण्याचा वाद सुरू होता. हा राग टोकाला गेल्याने अखेर जावयाचा जीव घेण्यात आला. ८ ऑगस्टच्या रात्री १० वाजता कृष्णा धोंगडे हे मेडिकल बंद करून त्यांच्या घराकडे जात होते. शहराबाहेरील साईबाबा मंदिराजवळ संशयित सासरे नरहरी रोकडे, मेहुणा पांडुरंग रोकडे, पवन रोकडे आणि शंकर पतंगे यांनी कृष्णाला यांचा रस्ता अडवून खोऱ्याच्या दांड्याने मारहाणीला सुरुवात केली. राग शांत होईपर्यंत या सर्वांनी कृष्णाला मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले.

हा प्रकार रस्त्यावरून जणाऱ्यांनी पाहिल्याने ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. जखमी कृष्णा यांना आधी परतूर, जालना येथे उपचारासाठी नेले परंतु त्यांची तब्येत गंभीर असल्याने नंतर छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. पण मुलीचे कुंकू बळकट ठरले नाही. काल शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना कृष्णा यांचा मृत्यू झाला.

Advertisements
Advertisements

याप्रकरणी सागर गुणाजी धोंगडे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसांत चौघांना जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मयत कृष्णा धोंडगे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक केंदे करीत आहेत. अधिकच्या महिन्यात घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button