‘जरांगेंना असं बोलायला लावणं, हे पाप कुणाचं आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही’ वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. जरांगे हे भाजप नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, मनोज जरांगे यांना असे बोलायला लावणं हे पाप कुणाचे आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही, मात्र ज्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल जरांगे बोलत आहेत, त्यांनी अशी भाषा वापरू नये असा सल्लाही वडेट्टीवारांनी मनोज जरांगेंना यावेळी दिलाय.
विश्वास कुणावर ठेवायचा, अशी माणसे फोडून अनेक बंड झालेत – वडेट्टीवार
मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत बोलताना, ही काही मॅच फिक्सिंग आहे का? जरांगे पाटील यांनी एक पाउल पुढे टाकले ते पुढे असावे. तसेच ज्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल ते बोलत आहेत त्यांनी अशी भाषा वापरू नये. सत्ताधारी आणि जरांगे यांच्यामध्ये काय चर्चा झाली हा त्यांच्यातला प्रश्न आहे. तर जरांगे यांना असे बोलायला लावणं हे पाप कुणाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. चर्चेसाठी भाजपचेच लोक जात होते. तुम्ही जे पेराल ते उगवते. विश्वास कुणावर ठेवायचा, अशी माणसे फोडून अनेक बंड झालेत, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय.