मुंबई : ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याविरोधात सध्या मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. पण राणा दाम्पत्य कोर्टात वारंवार गैरहजर राहिले आहेत. आजही त्यांनी कोर्टात गैरहजेरी लावली, यानंतर कोर्टानं त्यांच्यावर ताशेरे ओढले आणि न्यायव्यवस्था म्हणजे गंमत नव्हे अशा शब्दांत त्यांना झापलं.
राणा दाम्पत्याच्या कोर्टात गैरहजेरीची न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गंभीर दखल घेतली. संसदेचं अधिवेशन सुरु असल्यामुळं खासदार नवनीत राणा यांची गैरहजेरी समजू शकतो, पण आमदार रवी राणा गैरहजर का? असा सवाल यावेळी कोर्टानं विचारला.
विशेष म्हणजे राणा यांचे वकील रिझवान मर्चंट कोर्टात गैरहजर, सरकारी वकील सुमेर पंजवानी गैरहजर, केस तपासाधिकारी सुट्टीवर असल्यानं कोणीच कोर्टात हजर नव्हते. यामुळं कोर्ट भडकलं आणि न्यायव्यवस्था म्हणजे गंमत नव्हे, अशा शब्दांत कोर्टानं या सर्वांना झापलं.