वेसाक उत्सव, रॉयल थाई सरकारच्या विशेष निमंत्रणावरून डॉ. सिद्धार्थ हत्तिअंबिरे थायलंडला रवाना.!*
परभणी
*थायलंड देशात अत्यंत उत्साहाने साजरा होणा-या पवित्र वेसाक उत्सवात सहभागी होण्यासाठी रॉयल थाई सरकारच्या विशेष निमंत्रणावरून डॉ. सिद्धार्थ हत्तिअंबिरे थायलंडला रवाना.!*
==============
तथागत बुद्धांच्या जीवनात वैशाख पौर्णिमेला अनन्य महत्व आहे. बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण हे वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीच झाले. त्यामुळेच करणार्या जगभरातील लाखो बौद्ध वेसाख हा वर्षातील सर्वात पवित्र दिवस मानून अत्यंत उत्साहात साजरा करतात. थायलंड देशात वेसाख या सणाचे आगळे वेगळे महत्व आहे. सन 1999 मध्ये एक विशेष ठराव घेवून संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने आंतरराष्ट्रीय वेसाक दिनाला मान्यता दिली आहे. या वर्षीचा इंटरनॅशनल कौन्सिल फॉर वेसाक दिन (ICDV) 1 व 2 जून 2023 रोजी थायलंड देशाच्या महाचुलालॉन्गकोर्नराज विद्यापीठ, अयुथया येथे मोठया उत्साहात साजरा होणार आहे.महाचुलालॉन्गकोर्नराज विद्यापीठ, अयुथया, थायलंड येथे दि. 1 व 2 जून 2023 रोजी “जागतिक संकटाचा सामना करत असलेले बौद्ध तत्वज्ञान” या मुख्य विषयावर जागतिक बौद्ध प्रतिनिधिंच्या उपस्थितित व्यापक विचार-मंथन होणार आहे. या जागतिक उत्सवात भारताचा एक सन्मानित प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांना विशेष धम्मदूत म्हणून सादर आमंत्रित करण्यात आले आहे. थायलंडच्या सर्वोच्च संघ परिषदेचे अध्यक्ष व इंटरनॅशनल कौन्सिल फॉर डे ऑफ वेसाकचे अध्यक्ष, आदरणीय प्रा. डॉ. प्रा. ब्रह्मपुंडित यांनी पाठवलेल्या विशेष निमंत्रणावररून या सोहळयाला उपस्थित रहाण्यासाठी डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे थायलंडला रवाना झाले आहेत. डॉ.सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या व प्रचंड यशस्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाच्या धम्म पदयात्रेच्या कार्याची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. डॉ.सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांच्या आंतरराष्ट्रीय धम्म कार्याबद्दल धम्मपद यात्रा कोर कमिटीचे सदस्य डॉ. प्रकाश डाके, डॉ.भगवान धुतमल, भीमराव शिंगाडे, भगवान जगताप प्रा. डॉ. संजय जाधव, प्रा. डॉ. भीमराव खाडे , पंकज खेडकर, कीर्तीकुमार बुरांडे, राजेश रणखांबे, मकरंद बानेगावकर, डॉ.सुनील तुरूकमाने, अविनाश मालसमिंदर, अमोल धाडवे आदिंनी हार्दिक अभिनंदन केले आहे.