Uncategorized

बोर्डीकर विटेकर फड जामकर यांचा निर्धार महायुतीचा उमेदवार निवडून आणणार

बोर्डीकर विटेकर फड जामकर यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक संपन्न

परभणी

विशेष

 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूकीपूर्व तयारी संदर्भात माहिती सादर केली. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी  यांच्या नेतृत्वाखाली होत असलेली विकासकामे, नियोजित प्रकल्प, विविध योजना, जनसंपर्क, गावनिहाय संघटन, पुढील काळातील व्यूहरचना, विविध कार्यक्रम, संभाव्य रणनिती अशा विविध विषयांवर पदधिकाऱ्यांनी आपली मनोगते मांडली. आणि सर्वांनी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
जिंतूर येथे संपन्न झालेल्या या बैठकीस माजी आ.रामप्रसादजी बोर्डीकर , परभणी लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष राजेश विटेकर,माजी आ.मोहन भाऊ फड, डॉ.केदारजी खटिंग , भाजपा जेष्ठ नेते विजयराव वरपूडकर, मा.विजयराव जामकर, मा. विलासजी बाबर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांतजी राठोड यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते, सर्व पदधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, बुथप्रमुख, सर्व सेलचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

 

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button