देश -विदेश

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, १५ घरं जाळली; युवकावर गोळीबार

नवी दिल्ली : मणिपूरच्या इम्फाल पश्चिम जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार भडकला. हिंसक गर्दीने १५ घरं जाळली. शिवाय गोळीबार झाल्याची माहिती आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाला. अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी लँगोल गावात गर्दी झाली. या गर्दीने सुमारे १५ जणांची घरं जाळली. सुरक्षा दलाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अश्रृधुराचा वापर केला.

युवकावर गोळीबार

या हिंसाचारात एका ४५ वर्षीय युवकावर गोळीबार करण्यात आला. त्याच्या डाव्या पायावर गोळी लागली. जखमी युवकाला क्षेत्रीय आयुर्वेदिक संस्थानमध्ये भरती करण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. युवकाची परिस्थिती धोक्याबाहेर आहे. परंतु, सुरक्षा दलाने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

व्यापाऱ्याचे दुकान जाळले

इंफालच्या पूर्व भागातील जिल्ह्यांतही हिंसाचार झाला. चेकोन भागात शनिवारी एका मोठ्या व्यापाऱ्याच्या दुकानाला आग लावण्यात आली. त्यात व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले. शिवाय जवळच्या तीन घरांना आग लागली. अग्नीशमन विभागाने आग नियंत्रणात आणली.

Advertisements
Advertisements

आतापर्यंत १६० जणांचा बळी

काँगपोकपी जिल्ह्यात सुरक्षादल आणि आंदोलकांमध्ये गोळीबार झाला. ही घटना न्यू किथेल्मनबी पोलीस ठाण्यातील के. ए. मुंगचमकोम भागात घडली. सुरक्षा दलाने आंदोलकांना अटक केली. त्यांच्याजवळील ५० राऊंडवाली एसएलआर जप्त केली.

जनजीवन विस्कळीत

२७ विधानसभा क्षेत्राच्या समन्वय समितीच्या वतीनं गेल्या २४ तासांत हिंसाचार झाला. यामुळे मणिपूरमधील जनजीवन विस्कळीत झाले. राज्यात जातीय हिंसाचार ३ मे रोजी सुरू झाला. गेल्या तीन महिन्यांमध्ये १६० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या कारवाईत आतापर्यंत ११९५ शस्त्र जप्त करण्यात आले.

सुरक्षा दलाचा अश्रृधुराचा वापर

तीन दिवसांपूर्वी चुराचांदपूर येथे ३५ जणांचे मृतदेह सामूहिक दफन करत असताना हिंसाचार भडकला होता. चुराचांदपूर आणि विष्णूपूर सीमेवर सुरक्षा दल आणि गर्दीमध्ये हिंसा भडकली. गर्दीकडून दगडफेक करण्यात आली. सुरक्षा दलाने अश्रृधुराचा वापर केला.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button