देश -विदेश

गुगलवर चुकूनही सर्च करू नका या ५ गोष्टी, १० लाखाच्या दंडासोबत जेलची हवा खावी लागेल

नवी दिल्लीः गुगलचा वापर सर्वच जण करतात. गुगलवर काहीही सर्च केल्यास त्याची माहिती मिळते. त्यामुळे अनेक जण गुगलवर काहीही सर्च करीत असतात. परंतु, गुगलवर काही गोष्टी सर्च करणे चांगलेच महागात पडू शकते. कारण, असे काही टॉपिक्स आहेत. जे गुगलवर सर्च करणे बेकायदेशीर आहे. असे केल्यास तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंत दंड आणि जेलची शिक्षा सुद्धा होवू शकते. जाणून घ्या या संबंधी.

  • गुगलवर कधीच गर्भपात कसा केला जातो. असं सर्च करू नका. हे कायद्याने बेकायदेशीर आहे. यासाठी सरकारने कायदा केलेला आहे. जर तुम्ही यासंबंधी काही सर्च करीत असाल तर तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.
  •  जर तुम्ही छोट्या मुलासंबंधी काही अश्लील कंटेंट सर्च करायच्या भानगडीत पडलात तर तुमची थेट रवानगी जेलमध्ये होवू शकते. तसेच तुम्हाला दंड सुद्धा लावला जावू शकतो. POSCO अॅक्ट अंतर्गत तुम्हाला कंटेंट सर्च करण्यासाठी ५ ते ७ वर्षाची शिक्षा होवू शकते.
  • जर तुम्ही गुगलवर बॉम्ब कसा बनवला जातो, यासंबंधी सर्च केले तर तुमचे दिवस फिरलेच म्हणून समजा. कारण, हे सुद्धा कायद्याने बेकायदेशीर आहे. असे केल्यास तुम्हाला कायद्याने शिक्षा होवू शकते.
  •  जर तुम्ही गुगलवर पायरेटेड मूव्हीच सर्च करीत असाल तर तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. यात तुम्हाला ३ वर्षाची जेल होवू शकते. तसेच १० लाख रुपयाचा दंड सुद्धा होवू शकतो.

समाजात वावरताना अशा काही संवेदनशील घटना असतात. त्या गुगलवर सर्च करीत बसल्यास तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. कोणत्याही पीडित व्यक्तीचे गुगलवर सर्च करू नका. यामुळे तुम्ही अडचणीत येवू शकता.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button