देश -विदेश

शाळा-कॉलेज बंद, रुग्णालयांमध्ये हाफ डे अन् मांस विक्री दुकानांना टाळे

अयोध्या: २२ जानेवारीला अयोध्येतील श्री राम मंदिरात अभिषेक सोहळा होणार आहे. याबाबत कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर मांस आणि दारूची दुकानंही बंद राहतील. सरकारी आदेशानुसार सोमवारी म्हणजेच २२ जानेवारीला कसिनो उघडणार नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेता सर्व केंद्रीय कार्यालयांना सोमवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय अनेक राज्यांनी अर्ध्या दिवसाची सुट्टीही जाहीर केली आहे.

दुसरीकडे, दिल्लीच्या एम्सने आदेश जारी केला आहे की, २२ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत ओपीडी सुविधा उपलब्ध होणार नाही. या कालावधीत तुम्ही चाचणी आणि इतर सुविधांपासून वंचित राहाल. मात्र, सर्व प्रकारच्या आपत्कालीन सेवा सुरू राहतील. सर्व नियोजित शस्त्रक्रिया (ज्या नंतर केल्या जाऊ शकतात) पुन्हा शेड्यूल केल्या जातील, परंतु जर एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात नेले गेले तर त्याच्यावर उपचार केले जातील. सामान्य ओपीडी संध्याकाळी सुरू होईल, असंही एम्सने सांगितलं.

त्याचवेळी डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यासह इतर रुग्णालयांमध्ये दुपारी २.३० नंतर ओपीडी सुविधा सुरू होईल. या काळात आपत्कालीन सेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलने आदेश जारी करून सांगितले की, ओपीडी सुविधेसाठी दुपारी अडीचनंतर, ओपीडी नोंदणी सुविधा दुपारी दीड वाजल्यापासून सुरू होईल. याशिवाय, सफदरजंग आणि लेडी हार्डिंज केंद्रीय सरकारी रुग्णालयांमध्येही अर्धा दिवस सुट्टी असेल.

Advertisements
Advertisements

मध्यप्रदेशात मांस विक्रीची दुकानं बंद

प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, २२ जानेवारी रोजी मध्य प्रदेशातील शहरी भागात सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं बंद राहतील. या संदर्भात नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाने महापालिका आयुक्त, मुख्य पालिका अधिकारी, महानगरपालिका आणि नगरपरिषदांना सूचना दिल्या आहेत. मध्य प्रदेशातील सर्व सरकारी कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी असेल. सर्व शासकीय कार्यालये दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

गोव्यात सर्व कसिनो बंद

राम मंदिर उद्घाटनाच्या शुभ मुहूर्तावर, गोव्यातील सर्व कसिनोने स्वेच्छेने २२ जानेवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत कसिनो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यूपी डीजीपीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

उत्तर प्रदेश डीजीपी विजय कुमार यांनी २२ जानेवारी संदर्भात आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ते म्हणाले की अयोध्येत मोठ्या संख्येने यात्रेकरू आधीच उपस्थित आहेत, जे धार्मिक स्थळं, धर्मशाळा आणि आश्रमांमध्ये मुक्काम करत आहेत. त्या धर्मशाळा आणि आश्रमाच्या व्यवस्थापकांना विनंती आहे की, सर्व भाविकांनी एकत्र दर्शनासाठी जाऊ नये. २२ जानेवारीनंतर दर्शनाची व्यवस्था केली जाईल. सर्व चेकपोस्टवर सखोल तपासणी मोहीम राबवावी.
भारत-नेपाळ सीमा, आंतरराज्य सीमा, अयोध्या आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यांच्या सीमांवर सखोल तपासणी केली जावी. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याशी संबंधित वाहनांची सेवा खंडित होऊ नये, असे त्यांनी सांगितले. अयोध्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांशी चांगला व्यवहार ठेवा. सरयू नदीत सुरक्षेसाठी तैनात असलेले जलपोलीस कार्यरत ठेवावेत. सीमेवर वाहनांची तपासणी करताना निष्काळजीपणा होता कामा नये. संशयास्पद वाहन किंवा व्यक्तीची कसून चौकशी करून चौकशी करावी. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर तात्काळ आणि कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

या राज्यांमध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी

उत्तर प्रदेशात सर्व शाळा-कॉलेजला सुट्टी असेल, तसेच मांस विक्री करणारी दुकानंही बंद राहतील. गोव्यात सर्व शाळा बंद असतील. कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर हरियाणात २२ जानेवारीला शाळांना सुट्टी असेल. ओदिशातही सरकारने हाफ डेची घोषणा केली आहे. गुजरातमध्येही २२ जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button