Uncategorized

ऐकलं का‌‌..‌… राष्ट्रवादीच्या खासदार खान यांनी पंतप्रधानांचे मानले आभार ;केलं तोंड भरभरून कवतिक ही….!

परभणी

विशेष

हनुमंत चिटणीस

Advertisements
Advertisements

आज राज्यसभेत खासदार डॉ फौजिया खान यांनी महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भाग असलेल्या मराठवाड्यामध्ये हिंगोली येथे लिगो ( Lasor Interferometer Gravitational Observatory ) प्रकल्प केंद्र शासनाने मंजुर केला त्या बाबत  पंतप्रधान यांचे अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय नासा या संस्थेने निश्चित केल्यानुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाची गुरुत्वाकर्षणीय केंद्रबिंदू असलेली लिगो (LIGO) ऑब्झर्वेटरी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात स्थापित करण्याचे ठरविले आहे. त्यांनी या लिगो निरीक्षण प्रकल्पाद्वारे देशाचे विविध विषयातील महत्त्व अधोरेखीत होणार आहे असे सांगीतले. देशाचे विज्ञान, विकास व संशोधन यात मोठी भर पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी यावेळी या निरीक्षणगृहासाठी शासनाने 2600 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगुन हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी या केंद्राच्या भोवतालच्या परिसरात मोठे विज्ञान संशोधन केंद्र, विज्ञान तंत्रज्ञान विद्यापीठ तसेच इतरही काही महत्त्वपूर्ण संशोधन केंद्र या ठिकाणी स्थापित व्हावेत अशी मागणी केली. माध्यमातून मराठवाड्याच्या व देशाच्या मध्यभागी असलेल्या अविकसित भागाचा विकास होण्यामध्ये निश्चितच मदत होणार आहे असे मत व्यक्त केले. यासाठी त्यांनी केंद्र सरकारने एक स्वतंत्र समिती मार्फत या बांधकामाचा वारंवार आढावा घ्यावा. हे बांधकाम लवकरात लवकर कसे होईल यादृष्टीने समितीने उपाययोजना प्रस्तावितकराव्यात असी मागणी केली. या प्रकल्पामुळे मराठवाडयातील युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होऊन या केंद्राच्या मान्यतेमुळे मराठवाड्याचा विकास होणार आहे. तसेच देशाचाही नावलौकीक होणार असल्याने त्यांनी देशाचे पंतप्रधान यांचे देखील आभार यावेळेस मानले.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button