देश -विदेश

चीनमध्ये भूस्खलन होऊन 47 ढिगाऱ्याखाली अडकले

चीनच्या युनान प्रांतात   भूस्खलन  होऊन सुमारे 40 हून अधिक लोक गाडले गेले आहेत. चिनी मीडिया रिपोर्टनुसार, युनान प्रांतात सोमवारी सुमारे 18 घरे गाडली गेली असून अनेक जण बेपत्ता आहेत. तर, 200 हून अधिक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. चिनी अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून 200 हून अधिक कर्मचाऱ्यांसह विविध उपकरणे घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.

China Xinhua वृत्तसंस्थेने एक्स मीडियावरील XHNews या अकाऊंटवरील ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, चीनच्या युनान येथे सोमवारी झालेल्या भूस्खलनात एकूण 47 लोक गाडले गेले आहेत. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी 33 अग्निशमन वाहने आणि 10 लोडिंग मशीनसह 200 हून अधिक बचाव पथकातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

दुर्गम युनान प्रांतात भूस्खलन

चीनमधील युनान या दुर्गम भागात भूस्खलन होणे सामान्य आहे जेथे हिमालयाच्या पठारावर उंच पर्वतरांगा आहेत. सोमवारी युनानमधील डोंगरांनी वेढलेल्या ग्रामीण भागात भूस्खलनाची दुर्घटना घडली. चीनच्या युनान प्रांतात भूस्खलनाच्या घटना घडत असतात. हा चीनचा एक दुर्गम भाग आहे, जिथे मोठे पर्वत आहेत.

Advertisements
Advertisements

200 जणांची सुखरुप सुटका

चीनमधील युनान या डोंगराळ भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भूस्खलनात 47 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून 200 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. दुर्घटनास्थळी अद्यापही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून मदत आणि बचाव कार्य अजून सुरू आहे. भूस्खलनात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या दक्षिण-पश्चिम प्रांत युनानमध्ये घडली. युनानमधील लियांगसुई गावात सोमवारी सकाळी सहा वाजता भूस्खलन झालं.

मदत आणि बचाव कार्य सुरू

झेनजियांग काउंटीमधील तांगफांग शहरामध्ये हा परिसर आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. भूस्खलनात 18 घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचं सांगितलं जात आहे. दुर्घटनाग्रस्त भागातून अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली अडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं प्रयत्न सुरू आहेत. भूस्खलन होण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button