राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित होता. या पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशा भोसले म्हणाल्या आहेत की, ”महाराष्ट्र भूषण हा सन्मान घरच्यांनी दिला, तो मला भारतरत्न सारखा आहे.”
यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना आशा भोसले म्हणाल्या की, ”मी फक्त मराठी नाही तर संपूर्ण भारतची कन्या आहे. माझे आईवडील, गुरु आणी दीदी यांचा मला आशीर्वाद आहे. म्हणून आज या ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया महाराष्ट्र शासनाने मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे.” या पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.