मराठवाड़ा

आनंदात पेपर द्यायला निघाला, एसटी हुकल्याने घात झाला

जालना : पेपर असल्याने सकाळी लवकर उठून आपल्या दोन सख्या चुलत भावांसह बुलढाणा येथे इंजनिअरिंगच्या पेपरसाठी दुचाकीने जात असताना जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई-पारध रस्त्यावर भीषण अपघात झाला. या दुचाकीच्या अपघातात १ जण ठार तर २ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

अनिकेत परसराम सोनुने (वय २१) असं अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव असून तो जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील मृर्तड येथील रहिवासी आहे. एकाच दुचाकीवरून तिघे पिंपळगाव रेणुकाईपर्यंत पोहोचले. पण त्याआधीच बस निघून गेल्याने ती बस पुढच्या गावात पकडण्यासाठी तिघे धाड या गावाकडे निघाले. याचवेळी समोरून येणाऱ्या मालवाहतूक वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात अनिकेत ठार झाला असून त्याचे दोघे भावंड जखमी झाले आहेत.

पळसखेडा मुर्तड गावातील सोनुनेवाडी वस्तीवर राहणारा अनिकेत परसराम सोनुने हा मलकापूर येथील व्ही.बी.कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. सुट्टी असल्यामुळे अनिकेत हा गावी आला होता. त्याची २६ एप्रिल रोजी परीक्षा असल्याने तो काल मंगळवारी सकाळी चुलतभाऊ अजिंक्य सोनुने आणि विकी सोनुने यांच्यासोबत पिंपळगाव रेणुकाई गावाकडे बस पकडण्यासाठी दुचाकीने जात होता.

Advertisements
Advertisements

मात्र, पिंपळगाव रेणुकाई येईपर्यंत तेवढ्यात बस निघून गेली होती. त्यामुळे पुढे धाड गावात बस मिळेल म्हणून ते तिघे दुचाकीवरून पुढे निघाले. परंतु त्यांची दुचाकी पारध गावाजवळ आली असता एका मालवाहतूक वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. तर अजिंक्य आणि विकी हे दोघे जखमी झाले. मयत अनिकेतच्या पश्चात आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने सोनुने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची पारध पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच वस्तीवरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पण अनिकेतचा मृत्यू झाल्याचे पाहून त्याच्या कुटुंबाने हंबरडा फोडला.

जखमी असलेल्या दोघांना उपचारासाठी रुगणालयात नेण्यात आले होते. तिथेही नातेवाईकांची मोठी गर्दी जमा झाली होती. या अपघातात एका होतकरू मुलाचा मृत्यू झाल्याने पळसखेडा मुर्तड गावातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनिकेत हा मागील काही वर्षापासून मलकापूर येथे इंजिनिअरिंग करत होता. त्याचे हे इंजिनअरींगचे शेवटचे वर्ष असल्याने त्याने कठोर मेहनत घेऊन परिक्षेची चांगली तयारी देखील केली होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होतं. अनिकेतच्या डोक्याला जबर मार लागलेला असल्याने दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालावली आणि अनिकेतचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न अधुरेच राहीले.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button