देश -विदेश

नैनीतालमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू

उत्तराखंडच्या नैनीताल (Nainital) मध्ये भीषण बस अपघात (Bus Accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. नैनीतालच्या नालनी परिसरात हा भीषण अपघात घडला आहे. नैनीतालमध्ये गेलेली पर्यटक बस दरीत कोसळून हा अपघात घडल्याची माहिती आहे. या बसमध्ये 30 ते 32 प्रवाशी होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातातील सात मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ (SDRF) और एनडीआरएफ (NDRF) टीम घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं. रविवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

बस दरीत कोसळून अपघात

कालाधुंगी रोडवरील नालनी येथे बस दरीत कोसळल्याची माहिती आपत्ती नियंत्रण कक्ष नैनितालकडून एसडीआरएफला देण्यात आली होती. या बसमध्ये 30 ते 32 जण असण्याची शक्यता आहे. बस दरीत कोसळली आहे, ही माहिती एसडीआरएफ पथकाला मिळाली. एसडीआरएफ कमांडंट मणिकांत मिश्रा यांच्या सूचनेनुसार, पोस्ट रुद्रपूर, नैनिताल आणि खैरना येथील एसडीआरएफ बचाव पथके तातडीने बचावासाठी घटनास्थळी रवाना झाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर एसडीआरएफ पथकाला आढळलं की, या बसमध्ये 32 लोक होते. हे हरियाणातील हिसार येथून नैनितालमध्ये फिरण्यासाठी आले होते.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button