देश -विदेश

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा (Assembly Election 2023 Dates)  या  पाच राज्यांच्या विधानसभा  निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.  मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि17,  नोव्हेंबर,  राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर, मिझोरममध्ये 7 नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांची  मतमोजणी 3 डिसेंबरला रोजी होणार आहे.

पाच राज्यात सोळा कोटीपेक्षा अधिक मतदार आहे. पाच राज्यात 679 जागांवर मतदान होणार आहे. 60 लाख युवा मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहे. मतदानासाठी नोंदणी  करणाऱ्यांमध्ये  महिलांची संख्या जास्त आहे. आदिवासी भागात PVTG मतदान केंद्राची सोय करण्यात  आली आहे.  ज्येष्ठ नागरिकांना व्होट फ्रॉम होम करता येणार आहे. लवकरच या पाच राज्यात आचारसंहिता  लागू करण्यात येणार आहे.   मिझोरममध्ये साडे आठ लाख, छत्तीगडमध्ये 2.03 कोटी, मध्य प्रदेशमध्ये 5.6 कोटी, राजस्थानमध्ये 5.25 कोटी आणि  और तेलंगणामध्ये 3.17 कोटी मतदार मतदान करणार आहेत.

  • मिझोरम – 7 नोव्हेंबर रोजी मतदान (Mizoram voting date)
  • छत्तीसगड – 7  आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Chhattisgarh voting date)
  • मध्यप्रदेश – 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Madhya Pradesh voting date)
  • राजस्थान – 23 नोव्हेंबर रोजी  मतदान (Rajasthan voting date)
  • तेलंगाणा –  30 नोव्हेंबर रोजी मतदान
  • पाच राज्यांचा निकाल – 3 डिसेंबर रोजी

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button