मराठवाड़ासेलू

आवकाळी पावसाने गहू, ज्वारी, हरभरा शेती पिकाचे नूकसान

सेलू : तालूक्यात झालेल्या आवकाळी पावसामूळे शेती पिकांचे प्रचंड नूकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास आवकाळी पावसामूळे हिरावून घेतला आहे. तालूक्यात सोमवारी (ता.०६) रात्री अकरा वाजेच्या सूमारास वादळी वार्‍यासह विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या पावसामूळे गहू, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले.

तर कापणी केलेले हरभरा पिकांच्या गंजीवरील ताडपत्र्या वार्‍यामूळे उडून गेल्याने हरभरा पिकांच्या गंजी भिजल्या आहेत. अगोदरच मेटाकूटीस आलेल्या शेतकर्‍यांना असा निसर्गााच्या प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. हरभरा, गहू, ज्वारी पिकांना अगोदरच उतारा कमी येत असतांना असा असमानी सकटांचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे.

एकीकडे सरकार मोठ्या प्रमाणात खत, रसायनिक औषधी, बियाणे यांच्या किंमतीत वाढ करत आहे. मात्र शेती मालास कमी भाव असल्याने शेती करणे परवडत नसून त्यामध्ये असा आस्मानी सूलतानी संकटाचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत असून शासनस्तरावरून मदत मिळण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button