मराठवाड़ामुख्य बातमी

१५ वर्षीय अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

जालना: पोहायला म्हणून मित्रांसोबत गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जालना शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रस्त्यावरील तलावात काल रविवारी दुपारी घडली. वैभव गणेश कावळे (वय १५) असे मयत मुलाचे नाव आहे.

रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे दुपारच्या सुमारास वैभव आणि त्याचे २ मित्र तलावात पोहण्यासाठी गेले होते. तलावात पोहण्यासाठी तिघे उतरले. परंतु पोहण्याची सवय नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तिघांपैकी वैभव कावळे हा पाण्यात बुडू लागला.

वैभव पाण्यात बुडतोय हे पाहताच घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी आरडाओरड सुरू केली. परंतु, दुर्दैवाने जवळपास कुणीच नव्हते. रविवार असल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाणारे पण नसल्याने वैभव बुडेपर्यंत मदत मिळू शकली नाही. त्यानंतर मुलांनी रस्त्यावर येऊन हा प्रकार सांगितल्यावर लोकांनी तलावाकडे धाव घेतली. पण, तोपर्यंत वैभव पाण्यात बुडून गेलेला होता. नागरिकांनी ही माहिती पोलिसांना कळवताच चंदनझिरा पोलिसांनी अग्निशमन दलासह घटनास्थळी धाव घेतली.

Advertisements
Advertisements

अग्निशमन दलाच्या पथकाने तलावात वैभवचा शोध घेत मृतदेह बाहे काढला आणि घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयान पाठवला. याच तलावात बुडून गेल्यावर्षी एका युवकाचा मृत्यू झाला होता हे विशेष.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला. त्यानंतर तब्बल एक ते दीड तासाने वैभवचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. चंदनझिरा पोलिस स्टेशनचे निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कांबळे, प्रशांत देशमुख यांनी नागरिकांच्या मदतीने वैभावचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. यावेळी त्याच्या घरच्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. तर परिसरातील नागरिकही या घटनेने हळहळले आहेत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button