मुख्यमंत्री विधिमंडळाचे सभापती उपसभापती यांच्या उपस्थितीत माजी आमदारांच्या प्रश्नावर ऍड विजय गव्हाणे यांच्या नेतृत्वात विशेष बैठक
मुंबई
विशेष
महाराष्ट्र राज्यातील माजी आमदारांच्या विविध आणि प्रलंबित मागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते एडवोकेट विजय गव्हाणे यांच्या समवेत सभापतींच्या जालनात एक विशेष बैठक घेण्यात आली
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला अध्यक्ष ज्येष्ठ नेते विजय गव्हाणे विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत माजी आमदार रामकुंड दिले राजपुरोहित मधु चव्हाण अहमदपूरचे भालेराव विलास शिंदे विजय शिंदे यांच्यासह अनेक आमदारांची प्रामुख्याने उपस्थिती होती
प्रारंभी अध्यक्ष एडवोकेट विजय गव्हाणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नार्वेकर आणि नीलम गोरे यांचे स्वागत करून सत्कार केला
माजी आमदारांचे 2018 पासून अनेक प्रलंबित प्रश्न आहेत . प्रामुख्याने पेन्शनची सूत्र आणि त्याची तातडीने अंमलबजावणी माजी , पेन्शनच्या सूत्रानुसार पेन्शन मिळावी आमदारांच्या पगार मृत्यू झाल्यानंतर राज्य शासनाच्या वतीने त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात करावा अशा मागण्या आणि दहा ते बारा प्रश्न एडवोकेट विजय गव्हाणे यांनी याप्रसंगी उपस्थित केले
माजी आमदारांच्या प्रश्नांना आणि त्यांना सन्मानाची वागणूक सामान्य प्रशासनाने द्यावी त्यांच्या पत्राला तातडीने तहसीलदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर दिले पाहिजे, सध्या तसे होत ताना दिसत नाही माजी आमदारांच्या प्रश्नांची ईटाळणी केली जाते अशी खंत गव्हाणे यांनी केली. माजी आमदारांच्या विधवांना देखील मेडिक्लेम देण्यात यावा असेही गव्हाणे यांनी सांगितले तसेच मुंबईमध्ये निवास व्यवस्था ही गेस्ट हाऊस मध्ये करावी त्यासाठी काही सूट रिझर्व करून ठेवावेत अशी मागणी झाल्यानंतर तशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत
त्यावर तातडीने एक समिती नियुक्त करून लगेच आदेश दिले जातील असे या वेळेला सांगण्यात आले
माजी आमदारांच्या पेन्शनच्या प्रश्नासंदर्भात एक समिती नियुक्त करण्यात आली असून एक महिन्यात त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत
माजी आमदार यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी येत्या पाच किंवा सहा एप्रिल रोजी मुंबईमध्ये एक विशेष बैठक संपन्न होणार आहे त्यासाठी महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय गव्हाणे उपस्थित राहतील
मे मध्ये माजी आमदार मेळावा होईल असेही ठरले आहे. अधिवेशन बोलवण्याचा विचारही संमत करण्यात आला