परभणीमुख्य बातमी

एक मे पासून मेडिकल साठी परभणी जिल्ह्यात मोठं आंदोलन. खा.जाधव यांची घोषणा

“मेडिकल’ कॉलेजमध्ये अडथळा आणल्यास पुन्हा जनआंदोलन उभारू : खा.जाधव
परभणी: ता.25
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेकरिता राज्य सरकारने मंजुरी बहाल केली आहे, त्यासाठी जागा व पुरेसा निधी सुद्धा उपलब्ध केला आहे, झारीतील शुक्राचार्यांनी या महाविद्यालयाच्या स्थापनेत आता कोणताही अडथळा आणू नयेत अन्यथा: त्या शक्ती विरोधात एक मे पासून मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी दिला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जून पासून सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रिया संदर्भात हालचाली सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहेत. असे असताना सुद्धा उच्चपदस्थ पातळीवरून छोट्या व किरकोळ गोष्टी पुढे करीत पुढील प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात हेतूत: अडथळे आणल्या जात आहेत, वास्तविकता खाजगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना स्थापनेसह मंजुरी व प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात अटी व शर्ती या समान असताना सुद्धा परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास किरकोळ कारणे दाखवून कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. वैद्यकीय व शिक्षण मंत्रालयाने व उच्च पदस्थ काही अधिकाऱ्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, हे प्रकार पूर्णतः निषेधार्य आहेत, चुकीचे आहेत,या जून पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून या प्रक्रियेत आता कोणीही अडथळे निर्माण करू नयेत असे स्पष्ट करीत खा.जाधव
तसे प्रकार केल्यास त्या शक्तीने विरोधात आम्ही परभणीकर मोठे जन आंदोलन उभारू असा इशारा खासदार जाधव यांनी दिला.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे व संबंधित मंत्रालयाच्या तीव्र उदासीनतेमुळेच हे प्रकार सुरू आहेत का ? की यात उच्च पातळीवर मोठी उलाढाल होते आहे? इतपत शंका उद्भवल्या असून या अनुषंगाने येत्या चार दिवसात गांभीर्याने विचार मंथन करीत सर्वपक्षीय नेते मंडळींसह आम्ही परभणीकर अक्षरशः रस्त्यावर उतरून या अज्ञातशक्तीविरोधात प्रखरपणे आंदोलन उभारतील असा इशाराही खासदार जाधव यांनी दिला.
दरम्यान या पत्रकार परिषदेस जेष्ठ नेते आमदार सुरेश वरपूडकर माजी महापौर भगवानराव वाघमारे ,डॉक्टर विवेक नावंदर पंजाबराव देशमुख समशेर वरडपूडकर यांच्यासह अन्य नेते मंडळी उपस्थित होती

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button