महाराष्ट्रमुख्य बातमी

शिवरायांची जगदंबा तलवार पुढच्या महिन्यात महाराष्ट्रात आणणार?

मुंबई : महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीबाबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी माहिती दिली आहे. ही तलवार सध्या ब्रिटमध्ये आहे. ‘आपण पुढच्या महिन्यात ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहोत. शिवरायांची तलवार आणि वाघनखं आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत’, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

शिवरायांची जगदंबा तलवार आणि वाघनखं महाराष्ट्रात आणण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना ब्रिटनच्या उपउच्चायुक्त ॲलॅन गॅम्मेल यांनी ब्रिटन सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार हे ब्रिटनला जाणार आहेत. यावेळी ब्रिटन सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एक सामंजस्य करार होणार आहे.

जगदंबा तलवार आणि वाघनखं मिळवण्यासंबंधी ब्रिटनच्या उप उच्चायुक्तांशी चर्चा केली होती. यासंबंधी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रिचनच्या उप उच्चायुक्त ॲलॅन गॅम्मेल आणि द्वीपक्षीय संबंधांचे उपप्रमुख इमोजेन स्टोन यांच्याशी चर्चा केली होती. गेल्या महिन्यात १६ एप्रिलला त्यांची बैठक झाली होती.

Advertisements
Advertisements

‘आपण पुढच्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहोत. आणि या दौऱ्यात सामंजस्य कराराला अंतिम स्वरुप देण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही वेगाने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणाऱ्या एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रण देण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. पण अजून हे नियोजून पूर्ण झालेले नाही’, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यंदा ३५० वर्षे होत आहेत. यापार्श्वभूमीवर २ जूनपासून राज्यात १०० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवाजी महाराजांचे वंशज महाराज आणि इतर मान्यवरांना या आयोजित कार्यक्रमांमध्ये निमंत्रित करण्यात येणार आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button