कृषिभुषण कांतराव काका देशमुख हे मराठा कृषी उद्योजक पुरस्काराने सन्मानीत
परभणी
मराठा सेवा संघाच्यावतीने माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा *मराठा कृषी उद्योजक पुरस्कार* 12 जानेवारी रोजी मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीवरील समारंभात मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री ॲड. पुरूषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मा.आ. रेखाताई खेडेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजीमंत्री आ. डाॕ. राजेंद्र सिंगणे , खा. प्रतापराव जाधव , आ. अमोल मिटकरी , आ. सरनाईक , मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार , प्रदेशाध्यक्ष इंजि. विजय घोगरे , महासचिव मधुकर मेहेकरे , कार्याध्यक्ष प्रा. अर्जून तनपुरे , संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे , प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे , आयुक्त गणेशराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषिभुषण कांतराव देशमुख यांचे कृषि , जलसिंचन , वृक्षसंवर्धन , ग्रामविकास , सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी सुरू केलेली *एक गाव एक स्वच्छ ,सुंदर स्मशानभुमी* हे अभियान जिल्ह्यात लोकचळवळ बनले आहे. आता मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ते राज्यपातळीवर पोहचले आहे, मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडने ते राज्यातील प्रत्येक गावात एक गाव एक स्वछ सुंदर स्मशानभूमी चळवळ राबवावी त्यामुळे गावागावात जातीय सलोख्याचे काम करण्यासाठी निश्चितच मदत होईल असे आवाहन त्यांनी केले.