Uncategorizedपरभणी

राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांच्या आमंत्रणावरून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लगेच आल्या…..

परभणी

विशेष

देशाचे नेते शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खुल्या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना  संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, आ. राजुभैय्या नवघरे व MCA चे सहसचिव संतोषराव बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisements
Advertisements

अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात सरकार वॉरियर्स या संघाने विजय मिळवून प्रथम क्रमांकाचे ८५ हजार ५५५ रुपायांचे बक्षीस पटकावले, तर द्वितीय क्रमांकाचे ५५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस मंथन मिलन या संघाने पटकावले असून, तृतीय ३५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस धूम बालाजी, परभणी या संघाने पटकावले आहे.

तालुक्यातील जनतेकडून एक अभिनेत्री म्हणून ज्या पध्दतीने स्वागत केले गेले त्या स्वागताने आपण भारावून गेले असून सोनपेठकरांचे हे प्रेम न विसरण्यासारखे असल्याची भावना सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी व्यक्त केली.

हजारो क्रिकेटप्रेमी चाहत्यांनी एक महिना चाललेल्या या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. कालच्या शेवटच्या दिवशी तर आजवरचा रेकॉर्ड तोडला असेच म्हणावे लागेल. .

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button