परभणीमराठवाड़ा

धावत्या बसचा टायर निखळला

परभणी : राज्यातील परिवहन विभागाच्या बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मागील काही दिवसांपासून एसटी बसची दूरवस्था दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत. कधी या बस अचानक बंद पडत आहेत तर, कधी बसचं पूर्ण छप्परच उडत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. परभणीत तर चक्क धावत्या बसचे चाकच निखळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

परभणीच्या गंगाखेड-पालम राष्ट्रीय महामार्गावर घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेल्या भरधाव वेगात असलेल्या बसचं चाक निखळलं आणि १०० फूट लांब जाऊन पडलं. सुदैवाने बसमधून प्रवास करणा-या ६२ प्रवाशांचा जीव वाचला आहे. पण नक्की काय घडलं हे जाणून घ्या.

गंगाखेड आगाराची बस गंगाखेड हुन पालम कडे ६२ प्रवासी घेऊन निघाली होते..गंगाखेड-पालम राष्ट्रीय महामार्गावरील केरवाडी जवळ धावत्या बसचे चाक निखळले..तरीही बस धावत होती.ही बाब याच रस्त्यावरून जात असलेल्या पीक अप चालक भागवत मुंडे यांना दिसली त्यांनी तात्काळ बस चालकाला हातवारे करून आवाज करून लक्षात आणून दिले तेव्हा बसचालक यांनी ही बस थांबवली…महत्वाचे म्हणजे या बसचा वेग जास्त असल्याने टायर चक्क १०० फुटांपर्यंत जाऊन पडले..सुदैवाने पीक अप चालक भागवत मुंडे यांनी ही गंभीर बाब लक्षात घेऊन बस चालकाच्या लक्षात आणून दिल्याने पुढील अनर्थ टळला.

Advertisements
Advertisements

एसटी महामंडळाच्या अनेक बस भंगार झाल्या आहेत. मात्र तरीही त्या रस्त्यांवर धावताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीमधील लालपरीचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील एसटीचा पत्रा हा हवेत उडाला आहे. तरी या एसटीचा चालक ही बस भरधाव वेगाने चालवत आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button