क्रीडा

बांगलादेशचा नागीन डान्स, विश्वचषकात पहिल्यांदाच श्रीलंकेला हरवले

बांगलादेशनं श्रीलंकेवर तीन विकेट्सनी मात करून, वन डे विश्वचषकात आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघांचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळं त्या दोन संघांमधला सामना ही निव्वळ औपचारिकता होती. या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशला विजयासाठी २८० धावांचं आव्हान दिलं होतं. नजमल हुसेन शान्तो आणि शाकिब अल हसननं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या १६९ धावांच्या भागिदारीच्या जोरावर बांगलादेशनं त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. शान्तोनं ९० धावांची, तर शाकिबनं ८२ धावांची खेळी उभारली. त्याआधी, चरिथ असालंकानं झळकावलेल्या शतकानं श्रीलंकेला सर्व बाद २७९ धावांची मजल मारून दिली होती.  विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदाच श्रीलंकेचा पराभव केला.

श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. बांगलादेशला पहिला धक्का बसला तो १७ धावांवर. सलामीवीर तनजीद हसन 5 चेंडूत 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तनजीद हसनला दिलशान मधुशंकाने बाद केले. बांगलादेशला दुसरा धक्का 41 धावांवर बसला. लिटन दास 22 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. दिलशान मधुशंकानेही लिटन दासला आपला शिकार बनवले. बांगलादेशच्या दोन विकेट झटपट गेल्या. पण त्यानंतर अनुभवी शाकीब अल हसन आणि शान्तो यांनी डावाला आकार दिला. यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि नजमुल हुसेन शांतो यांच्यात १६९ धावांची मोठी भागीदारी झाली. बांगलादेशकडून नजमुल हुसेन शान्तोने सर्वाधिक धावा केल्या. नजमुल हुसेन शान्तोने 101 चेंडूत 90 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार मारले. त्याशिवाय कर्णधार शाकीब अल हसनने 65 चेंडूत 82 धावा केल्या. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकार मारले.

श्रीलंकेसाठी दिलशान मधुशंका सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकांत 69 धावांत 3 फलंदाजांना तंबूत पाठवले. याशिवाय अँजेलो मॅथ्यूज आणि महिश तिक्षणा यांना प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.  रजिथा व्यतिरिक्त दुष्मंथा चमीरा आणि धनंजय डी सिल्वा यांना यश मिळाले नाही.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button