महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स, अडचणी वाढणार?

 मुंबई  : महाराष्ट्राची राजधानी मुंबईहून एक मोठी बातमी समोर आलीय. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. त्यांना बुधवारी चौकशीला हजर राहण्याचं समन्समध्ये सांगण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर याप्रकरणी गंभीर आरोप आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी पी. वेलरासू यांनादेखील ईडीने समन्स बजावले आहे.

किशोरी पेडणेकर ईडी चौकशीसाठी जाणार?

ईडीकडून गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर तपास सुरु होता. याच प्रकरणी ईडीने किशोरी पेडणेकर यांना चौकशीचं समन्स बजावलं आहे. ईडीने त्यांना सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली आहे. दुसरीकडे पालिकेचे वरिष्ठ अधिकारी पी. वेलरासू यांना उद्या ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांची याआधी गुन्हे शाखेकडून देखील चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना ईडी चौकशीला देखील सामारं जावं लागणार आहे.

दरम्यान, किशोरी पेडणेकर बुधवारी ईडी चौकशीला जातात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण या ईडीच्या समन्समुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालीय. किशोरी पेडणेकर या समन्सवर काय प्रतिक्रिया देतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी खिचडी घोटाळ्याप्रकरणी अनेकांना ईडीने समन्स बजावले आहेत. काहींची चौकशीदेखील झालीय. त्यानंतर आता पेडणेकर यांची चौकशी होणार आहे.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button