रायगड : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीत लोकसभेच्या चार जागा अजित पवार गट लढवणार असल्याचे आज अजित पवारांनी जाहीर केले आहे. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणारच आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत
अजित पवार म्हणाले, मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून आणायचे आहेत
बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागा आपण निवडणार आहोत. इतर जागांसंदर्भात आपण शिंदे, फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू. जागावाटपासंदर्भात या सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याची ताकद पाहून आपण त्यांची निवड करणार आहोत
अजित पवार म्हणाले, काही जण आमच्यावर आरोप करतात की यांच्यावर केसेस होत्या म्हणून हे तिकडे गेले . मी कॅबिनेटमध्ये त्या खात्याचा मंत्री होतो म्हणून मला टार्गेट केलं गेलं पण ते आरोप सिद्ध झाले नाही. मंत्री आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ते आदेश दिले होते. राज्यात ते सातत्याने भारनियमन 2012 रोजी होत होतं ते आम्ही बंद केलं. आज माझ्याकडे अर्थ खातं आहे. सहा लाख कोटींचं बजेट आहे.
मी कमीटमेंट पाळणारा नेता : अजित पवार
माझ्यावर जे आरोप झाले जलसंपदा विभागाची त्यानंतर त्याचा विकास रेंगळाला. मी कामाला मान्यता देतो म्हणुन मला टार्गेट करण्यात आलं. त्यावेळी नेमलेल्या समितीचा अहवाल आला आणि त्यांनी मला क्लीन चीट दिली. 32 वर्ष मी काम करतोय मला विचारलं जातं माझ्यावरच आरोप का होतात. परंतु मी कमीटमेंट पाळणारा नेता आहे. माझ्याकडे जीएसटी विभाग देखील होता. माझ्यावर आजपर्यंत कुठल्याही डीपीसीसंदर्भात आरोप नाही. काम व्हावी हीच कार्यकर्त्यांची अपेक्षा असते.
विकासकामाच्या बाबतीत जिल्हाध्यक्षांना प्राधान्य : अजित पवार
विकासकामांच्या बाबतीत पहिलं प्राधान्य राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना, दुसरं खासदारांना तर तिसरं राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना असणार आहे. युवती संघतेनेत काही वाद आहेत ते अदिती तटकरेने ते वाद मिटवावेत त्यामुळं युवती विभागाची जबाबदारी घे . जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न सोडवायला संधी मिळेल, असे देखील अजित पवार म्हणाले.