26 नोव्हेंबर रोजी हिंगोलीच्या (Hingoli) रामलीला मैदानावरील (Ramlila Maidan) वक्तव्य तायवाडे यांना भोवलं आहे. “ओबीसी (OBC) विरोधात बोलणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याची ताकद ठेवा”, असं वक्तव्य बबनराव तायवाडे यांनी केलं होतं. त्यांनतर मराठा समाजाच्या (Maratha Reservation) वतीनं तक्रार देण्यात आली होती.
बबनराव तायवाडे यांना जाहीरपणे चिथावणीखोर वक्तव्य (Provocative Statement) करणं भोवलं आहे. ओबीसीच्या एल्गार मेळावामध्ये (OBC Elgar Melava) चितावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलिसांत (Hingoli City Police) बबनराव तायवाडे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 नोव्हेंबर रोजी हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसीचा एल्गार करण्यात आला होता. या एल्गार मेळाव्यामध्ये ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी ओबीसींविरोधात बोलणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याची ताकद ठेवा, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मराठा समाज (Maratha Samaj) आक्रमक झाला होता. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिसांमध्ये मराठा समाजाच्या वतीनं तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर बबनराव तायवाडे यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.