महाराष्ट्र

उकळत्या पाण्याच्या टाकीत पडून दोन कामगारांचा मृत्यू

‘दौंड शुगर’मध्ये दोन कामगारांचा मृत्यू

आलेगाव येथील दौंड शुगर प्रा. लि. या साखर कारखान्यात ‘बॉयलिंग हाउस’चे पाणी रिसायकल करण्याआठी तयार करण्यात आलेल्या टाकीत पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही दुर्घटना झाली. संदीप कुंडलिक गरदाडे (वय २३, रा. पेडगाव,ता. दौंड) आणि गणेश सिताराम शिंदे (वय २३, रा. शेडगाव पिसारे, ता. करमाळा) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. या दुर्घटनेबाबत फारुक दुगे यांनी दौंड पोलिस ठाण्यात खबर दिली असून, अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गरम पाण्याच्या टाकीमधील लाइनमध्ये संदीप हे फोमवर पाणी मारण्याचे काम करीत होते. या वेळी निसरड्या पृष्ठभागावरून गरम पाण्याच्या टाकीमध्ये पाय घसरून ते पडले. संदीप टाकीत पडलेले पाहून खलाशी म्हणून काम करीत असलेले गणेश हे त्यांना वाचविण्यासाठी गेले. मात्र, तेदेखील टाकीत घसरून पडले. उपस्थित कामगारांनी त्वरित वरिष्ठांना माहिती दिली. यानंतर दोघांना टाकीतून बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी दौंड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश राऊत करीत आहेत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button