गंगाखेडमहाराष्ट्रमुख्य बातमी

गंगाखेडला आज रंगणार अपप्रवृत्ती पुतळा दहन सोहळा

आ. डॉ. गुट्टे, चौधरी, निरस यांची उपस्थिती

गंगाखेड : साई सेवा प्रतिष्ठानने गेल्या २३ वर्षांपासूनचा लवलेला आतिषबाजीसह अपप्रवृत्ती पुतळा दहन सोहळा ऊद्या दि. १२ ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे. गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते तर माजी सभापती बाळकाका चौधरी, बाबासाहेब निरस, प्रल्हाद मुरकुटे, ॲड. संदीप अळनुरे यांचेसह ईतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद यादव, सचिव नागेश पैठणकर व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री बालाजींच्या सुप्रसिद्ध रथ परिक्रमेनंतर हा कार्यक्रम संपन्न होतो. सांस्कृतिक कार्यक्रमांसह नेत्रदिपक आतिषबाजी व ५१ फुटी अपप्रवृत्ती पुतळा दहन हे आकर्षणाचे केंद्र असते. ऊद्या दि. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता गोदातट येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचे ऊद्घाटन गंगाखेडचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव भोसले, जि. प. माजी सभापती गणेशराव रोकडे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष किशनराव भोसले, उपसभापती संभाजीराव पोले, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूसेठ सोमाणी, अनिलसेठ यानपल्लेवार, कॉंग्रेस जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड. संतोष मुंडे, जेष्ठ पत्रकार दिलीप माने, पुणे येथील उद्योजक धनेश गांधी, जेष्ठ नेते अ. अश्फाकभाई, आ. गुट्टेकाका मित्र मंडळाचे विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, शहराध्यक्ष ॲड, सय्यद अकबर, नादबिंदु चे गोपी मुंडे, पत्रकार प्रमोद साळवे, रमेश कातकडे, सखाराम बोबडे आदिंसह ईतर मान्यवरांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने हजर रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे सर्वश्री गोविंद यादव, नागेश पैठणकर, विजयकुमार तापडिया, सुशांत चौधरी, हाजी गफार शेख, शेख युनूसभाई, संतोष तापडिया, नंदकुमार भरड, मनोज नाव्हेकर, कल्याण तुपकर, गजानन महाजन, गुंडेराव देशपांडे, किरण जोशी, सचिन नाव्हेकर, बालासाहेब यादव, जुगलसेठ तोतला, ॲड. पंकज भंडारी, राजेंद्र पाठक, राजू गळाकाटू, अमोल कोकडवार, बाळासाहेब राखे, मनमोहन झंवर, हरीभाऊ सावरे, कृष्णा पदमवार, संजयलाला अनावडे, अभिनय नळदकर, अंबादास राठोड, अतुल गंजेवार, भगत सुरवसे, गोविंद रोडे, कारभारी निरस, सचिन कोटलवार, राजू लांडगे, शाम कुलकर्णी, गजानन जोशी, अतुल तुपकर, मकरंद चिनके, नरेंद्र नळदकर, बंडू वडवळकर, दिलीप सोळंके, चंद्रकांत बोडखे, कैलास वाघमारे, रणजीत क्षीरसागर आदिंसह पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यंकटेश यादव, संजय सोनटक्के, रमेश औसेकर, सुहास देशमाने, परसराम गिराम, डिगंबर यादव, साहिल पैठणकर, अभिषेक लोखंडे, मारती गोरे, प्रथम यादव आदिंसह सहकारी परिश्रम घेत आहेत.

*यांचा होणार गौरव…*
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले सर्वश्री कल्पेश कुलकर्णी ( एमपीएससी राज्यात प्रथम ), कृष्णा सुर्यवंशी ( स्मशानभूमी सुधारक ), प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय शिक्षणात यश संपादन केलेले युवराज फड, अक्षय सोडगीर, मोहन चोरघडे, वेंदात ढाकणे, सय्यद आयेशा आणि गोदावरी स्वच्छतेसाठी अविरत झटत असलेले श्री व सौ. ॲड स्मिता राजू देशमुख यांचा याप्रसंगी विशेष गौरव केला जाणार आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button