क्राईममहाराष्ट्रमुख्य बातमी

आरोपींच्या फोनमध्ये बाबा सिद्दीकींच्या कुटुंबातील सदस्याचा फोटो

पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीच्या फोनमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबातील सदस्याचाही फोटो आढळल्याने खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचा फोटो आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या फोनमध्ये सापडला आहे. आरोपींना स्नॅपचॅटवरुन हा फोटो शेअर करण्यात आल्याची माहिती आहे. याआधीही आरोपींनी झिशान हेही आपल्या टार्गेटवर होते, अशी कबुली दिली होती. घटनेवेळी फोन आल्यामुळे ऑफिसच्या दिशेने गेलेले झिशान हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याचे बोलले जाते.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची व्याप्ती वाढत चालली आहे. सिद्दिकी यांच्या हत्येमध्ये दोन-चार नव्हे तर अनेक आरोपींचा हात असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पनवेल आणि कर्जतमध्ये केलेल्या कारवाईवरून समोर आले आहे. पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पाच जणांना अटक केली आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button