परभणी
विशेष
हनुमंत चिटणीस
पाथरी विधानसभा मतदारसंघात या वेळेला अत्यंत महत्त्वाची चुरस पाहायला मिळणार आहे. विधानसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला. राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुरानी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . त्यांची उमेदवारी कोणत्याच पक्षाच्यावतीने अद्याप तरी जाहीर झालेली नाही किंबहुना शरद पवार यांच्या गटाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता त्यांना स्वतः आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे सुरेश वरपूडकर निश्चित झाले आहेत. राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर पक्के आहेत. शिवसेनेचे सईद खान हे बंडखोरा च्या तयारीत असल्याचे दिसले आहे. भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते देखील बंडखोरी करणार आहेत.
ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे प्रत्येकाला आमदार व्हावसं वाटतं आहे आणि त्यानिमित्ताने एकमेकांचे शत्रू एकत्र येत असल्याचे दिसते दिसत आहे