देश -विदेशमुख्य बातमी

चंद्र, सूर्यानंतर भारताची पुढची झेप आता मिशन मंगल-२

बंगळुरु : चंद्र, सूर्यानंतर ISRO आता मंगळ ग्रहाची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ISRO ने तयारी सुरु केली आहे. 2024 मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो मंगळयान-2 मिशन लॉन्च करणार आहे. NASA ला ज्यामध्ये यश मिळालेलं नाहीय, ती रहस्य उलगडण्याचा इस्रो प्रयत्न करणार आहे. त्याआधी इस्रोच सर्व लक्ष मिशन गगनयानवर आहे. भारताची ही पहिली मानवी अवकाश मोहीम आहे.

चंद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करुन भारताने इतिहास रचला. त्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आणखी एक यश मिळवलं. सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी आदित्य L-1 मिशन ल़ॉन्च केलं. या यानाचा सध्या L1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरु आहे. गगनयान मिशनची टेस्टिंग जवळपास पूर्ण झाली आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांनी आता मंगळयान-2 वर काम सुरु केलय. 2024 च्या अखेरपर्यंत इस्रो मिशन मंगळयान लॉन्च करु शकतं. हे मार्स ऑर्बिटर मिशन -2 असणार आहे. याआधी 2014 साली भारताची पहिली मंगळ मोहीम यशस्वी ठरली होती. महत्त्वाच म्हणजे पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वी पाऊल ठेवणारा भारत जगातील पहिला देश ठरला होता.

आता दुसऱ्या मिशनचा उद्देश काय?

Advertisements
Advertisements

मंगळयान-1 ही भारताची दुसऱ्या ग्रहावरील पहिली मोहीम होती. पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे मिशन लॉन्च करण्यात आलं होतं. मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्य मंगळयान-1 ने प्रवेश केला होता. मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत जगातील चौथा देश ठरला होता. आता इस्रो मंगळ ग्रहाच्या पुढच्या टप्प्यावर काम सुरु करणार आहे. मार्स ऑर्बिटर मिशन -2 मध्ये मंगळाच्या ऑर्बिटमधूनच तिथलं पर्यावरण आणि वातावरणाचा अभ्यास करण्यात येईल. या मिशनद्वारे माहिती नसलेली बरीच नवीन माहित मिळू शकते.

मंगळयान-2 मध्ये किती पेलोड असतील?

मंगळयान-2 मिशनमध्ये चार पेलोड पाठवण्यात येतील. मार्स ऑर्बिट डस्ट एक्सपेरिमेंट (MODEX) असेल. हा पेलोड मंगळावरील धुळीचा अभ्यास करेल. त्याशिवाय एनर्जेटिक आयन स्पेक्ट्रोमीटर (EIS) असेल. त्याद्वारे चुंबकीय किंवा गुरुत्वाकर्षणाची माहिती मिळवली जाईल. रेडियो ऑकल्टेशन (RO) हा तिसरा पेलोड मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करेल. इलेक्ट्रिक फील्ड एक्सपेरिमेंट या चौथ्या पेलोडमध्ये हाय रिजॉल्यूशन कॅमेरा असेल, ज्याद्वारे मंगळाचे फोटो काढण्यात येतील. सध्या मंगळावर नासाच मार्स एटमोस्फेयर एंड वोलेटाइल एवोल्युसन म्हणजे Maven मिशन सुरु आहे. 2 वर्षांसाठी हे मिशन डिजाईन करण्यात आलं होतं. 2013 मध्ये सुरु झालेली ही मोहीम अजून सुरु आहे. हे यान मंगळावर काम करणाऱ्या नासाच्या रोव्हरशी कनेक्ट आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button