मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले. पण एक आवाजसुद्धा निघाला नाही. पण हा आवाज सरकारच्या कानात गेला. आता डोळ्यात अश्रू आणणारी परिस्थिती बीडमध्ये निर्माण झाली होती. आमच्या आमदारांची घरे जाळली गेली. पिस्तूल काढले गेले. अजितदादा हे षडयंत्र आहे. ते षडयंत्र उघड करा. त्यामागे कोण आहे ते समोर आणा. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. परंतु कोणावर अन्याय होत असेल तर आवाजसुद्धा उठवावा लागणार आहे, असे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवशीय राष्ट्रीय शिबीर झाले. त्यावेळी ते बोलत होते.
आपणास जास्त संघर्ष आपल्या जुन्या मित्रांसोबत करावा लागत आहे. त्या जुन्या मित्रांनी बदललेल्या परिस्थितीचा विचार करा. पण मी एकच सांगतो अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. दलित समाज, अल्पसंख्याक, ओबीसी, मराठा समाजाला सोबत घ्यावे लागणार आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार? हे जनतेच्या मनात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. फक्त दुसऱ्याच्या आरक्षणास धक्का न लावता मिळाले पाहिजे. मी हे जो बोलत आहे तेच राज्यातील सर्व पक्षीय नेते बोलत होते. दादा आता जातीय जनगणनेची मागणी आपण करायला हवी. इतर कोणी मागणी करण्यापेक्षा आहे.