युनिट :- परभणी
तक्रारदार :- पुरुष, वय 33 वर्षे
आरोपी :- 1) स्वप्नील शिवाजीराव पवार, वय 45 वर्षे, पद – विस्तार अधिकारी (पंचायत ),अतिरिक्त कार्यभार गट विकास अधिकारी,पंचायत समिती मानवत (वर्ग 3) 2)संदीप बाळासाहेब पवार वय 29 वर्षे ,पद – विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती मानवत (वर्ग 3)
तक्रार प्राप्त:- दि. 22/02/2023
लाच मागणी पडताळणी:- दि. 02/03/2023, दि. 27/03/2023
लाच स्विकारली:- दि. 27/03/2023
लाचेची मागणी रक्कम:- 4000/- रु.
लाच स्विकारली रक्कम:- 4000/- रु.
थोडक्यात हकिकत:- यातील तक्रारदार यांनी पंचायत समिती मानवत जि. परभणी येथे दि.17.10.2022 ते दि. 21.10.2022 या कालावधी दरम्यान राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ‘आमचा गाव , आमचा विकास ‘ उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिलेले होते. तक्रारदार यांचे सदर कामाचे मानधन 14,000 रू. आलोसे क्र.2 यांच्या खाजगी बँक अकाऊंटवर जमा झाले होते. सदर मानधन घेण्यासाठी तक्रारदार यांनी आलोसे क्र.1 व 2 यांना वारंवार प्रत्यक्ष भेटून मागणी केली. तसेच तक्रारदार यांनी वरिष्ठांना लेखी तक्रार करून सुद्धा त्यांना मानधनाची रक्कम देण्यात आलेली नव्हती.
यातील आलोसे क्र.2 यांनी 14,000 रू. रक्कमेचा देय चेक न देता 10,000 रू रक्कमेचा स्वतः च्या वैयक्तिक बँक खात्याचा चेक देऊन 4,000 रू.कमिशन स्वरूपात लाचेची रक्कम स्विकारली आहे.
तसेच दि.02.03.23 रोजी व दि.27.03.23 रोजी यातील आलोसे क्रं.2 यांनी सदर मागणी केलेल्या व स्विकारलेल्या लाचेच्या रक्कमेस आलोसे क्र.1 यांनी पंचासमक्ष प्रोत्साहन देऊन संमती दिली आहे.
आलोसे क्र. 1 स्वप्नील पवार गटविकास अधिकारी (अतिरिक्त कार्यभार), पंचायत समिती मानवत व आलोसे क्रं. 2 संदीप पवार विस्तार अधिकारी ,पंचायत समिती मानवत जि परभणी यांना ताब्यात घेतलेले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन मानवत येथे चालु आहे.
मार्गदर्शक:- डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड.
सापळा पथक:- किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, पोनि सदानंद वाघमारे, पोनि बसवेश्वर जकीकोरे, पोह चंद्रशेखर निलपत्रेवार, पोह मिलिंद हनुमंते, पोशि अतुल कदम, पोशि शेख मुख्तार, पोशि शेख झिब्राईल, चालक पोह जनार्धन कदम, अँटी करप्शन ब्यूरो टिम परभणी
तपास अधिकारी:- किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, परभणी.
परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
डॉ. राजकुमार शिंदे ,
पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो,
नांदेड परिक्षेत्र, नांदेड
मोबाईल नंबर – 09623999944
किरण बिडवे,
पोलिस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, परभणी
मोबाईल नंबर – 07020224631
अँटी करप्शन ब्यूरो, परभणी कार्यालय दुरध्वनी – 02452-220597
@ टोल फ्रि क्रं. 1064