मुख्य बातमीराजकारण

मुंबई महापालिकेकडून दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी

यंदा शिवाजी पार्कवर आवाज ठाकरेंचाच

मुंबई : यंदाही शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसऱ्याच्या (Dasara Melava) मुहूर्तावर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. ठाकरे गटाला मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) जी उत्तर विभागानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? हा प्रश्न निकाला निघाला आहे. 24 ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.

शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा हा वाद अखेर मिटला आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवागनी मिळाली आहे. मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला ही परवागनी दिली. त्यानुसार ठाकरे गटाचा दसरा मेळावा 24 ऑक्टोबरला शिवतीर्थवर होणार आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी दुसरीकडे घेण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला होता. अखेर आज महापालिकेने शिवसेना ठाकरे गटाला परवानगी दिली.

ठाकरे गटाच्या नेत्यांची प्रतिक्रिया

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी आपली प्रतिक्रिया एबीपी माझाकडे दिली. “हा नैतिकतेचा विजय आहे. महापालिकेने यापूर्वीच विचार करुन याआधीच परवानगी द्यायला हवी होती. पण उशिरा का असेना पण मनपाने शहाणपण दाखवलं. परवानगीमध्ये जो तांत्रिक भाग होता, त्यानुसार अर्जदाराचा पत्ता सेनाभवनाचा होता. सेनाभवनातूनच आपण पत्रव्यवहार करतो. तो आम्ही यापूर्वीच केला होता. गेल्या वर्षीही कोर्टाने आम्हाला परवानगी दिली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शिस्तप्रिय शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा होईल”, असं सचिन अहिर म्हणाले.

Advertisements
Advertisements

शिंदेंचं एक पाऊल मागे, ठाकरेंचा मार्ग मोकळा? 

मंत्री दीपक केसरकरांनी शिंदे गट शिवाजी पार्क नाहीतर क्रॉस मैदान किंवा ओव्हल ग्राउंडवर दसरा मेळावा घेणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनंतर मुंबई महापालिकेत शिवाजी पार्कसाठी केलेला अर्जही शिंदे गटानं मागे घेतला होता. शिंदे गटानं एक पाऊल मागे घेतल्यानंतर ठाकरेंचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र मुंबई महानगरपालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नव्हता. अखेर आज महापालिकेनं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा निर्णय निकाली काढला. महापालिकेकडून ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार आहे. तसेच, आम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही. विकासाचं राजकारण करतो. त्यामुळेच वादात न जाता शिवाजी पार्कऐवजी दुसरं मैदान आम्ही घेतलेलं आहे. ठाकरे गट स्वत:च राजकारण करतो आणि स्वत:च प्रसिद्धी मिळवतो, हे आता जनतेनं ओळखावं, असा टोलाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान, शिंदेंनी दसरा मेळाव्यासाठी नवे पर्याय शोधले असून शिवाजी पार्कवरचा दावा सोडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या शिंदे गटानं घेतलेल्या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमकं कोणाला मिळणार? हा वाद संपुष्टात आला आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button