गंगाखेड

भीडे यांच्याविरोधात गंगाखेड पोलीसांत तक्रार

गंगाखेड : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बाबतीत संभाजी भीडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. गंगाखेड पोलीस ठाण्यात आज फिर्याद देवून भीडे यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. गंगाखेड कॉंग्रेस आणि भारपच्या वतीने ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. या अपप्रवृत्तीस वेळीच न रोखल्यास आंदोलन करण्याचा ईशारा या प्रसंगी देण्यात आला.
गंगाखेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव, भाकपचे तालुका सचिव ओंकार पवार, योगेश फड, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव सिद्धार्थ भालेराव, भाई गोपीनाथ भोसले, रोहीदास लांडगे, अशोक जाधव आदिंनी आज ही तक्रार दाखल केली. पोलीस ऊपअधिक्षक दिपक टीपरसे, पोलीस निरीक्षक कुंदन वाघमारे आदिंशी चर्चा करत संभाजी भीडे यांचेवर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. सदर प्रकरणी विधानसभेत चर्चा झालेली असून वरीष्ठ पातळीवरून यासंदर्भात निर्णय अपेक्षीत आहे. तो होताच स्थानिक पातळींवर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही पोलीस ऊपअधिक्षक टीपरसे, पो. नि. वाघमारे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button