परभणी : अतिशय खडतर समजल्या जाणा-या अमरनाथ यात्रेकरिता परभणीतून शुक्रवार, दि.०७ जुलै रोजी ७० भाविकांचा जथ्था रवाना झाला. अमरनाथ यात्रेस ०१ जुलै पासून सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाविकांचे जथ्थे या यात्रेनिमित्त जम्मू-काश्मिरच्या दिशेने रवाना होत आहेत. परभणीतून सुध्दा यावर्षी ७० भाविकांचा जथ्था शुक्रवारी पूर्णा रेल्वे जंक्शनवरुन जम्मूतावी एक्सप्रेसने जम्मू काश्मिरकडे रवाना झाला.
यात अंसीराम दावलबाजे, सचिन देशपांडे, राहुल जैस्वाल, शंभू ठाकूर, बाळू हट्टेकर, रामभाऊ कदम, संजय साखरे, रवी नखाते, अभिषेक खराटे, स्वप्नील जैस्वाल, सागर जैस्वाल, शंकर गायकवाड, अनिल झांबरे, मारोती सावळे, राजेंद्र पूरजळकर यांच्यासह अन्य भाविकांचा समावेश आहे. हा जथ्था जम्मू येथून पहेलगामकडे व पुढे अमरनाथकडे पायी यात्रेस रवाना होणार आहे. अतिशय खडतर समजल्या जाणा-या या यात्रेस पहेलगाम मार्गे ३६ किलोमीटरचा पहाडी मार्ग हे भाविक सर करणार आहेत. या भाविकांना शुभेच्छा देण्याकरीता मोठ्या संख्येने नातेवाईकांसह मित्र परिवार रेल्वेस्थानकावर उपस्थित होता.