महाराष्ट्रमुख्य बातमी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग मुंबईमध्ये करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने त्यांच्या दरे या गावी जाणार होते. राजभवन येथून हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र काही तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईच्या जुहूमधील पवन हंस हाऊस येथे हेलिकॉप्टरने इमर्जन्सी लँडिंग केले आहे.  ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने यासंदर्भात माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता गाडीने दरे गावाला निघाले आहेत. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर साताऱ्याच्या दिशेने जाऊ शकले नाही. त्यामुळे जुहूमधील पवन हंस येथे लिकॉप्टरने इमर्जन्सी लँडिंग केले आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button