तिरुअनंतपुरम : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमन चांडी यांचे मंगळवारी सकाळी (१८ जुलै) निधन झाले. चांडी यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमन चांडी हे ७९ वर्षांचे होते. ओमन चांडी हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर बंगळुरू येथे उपचार सुरू होते. २०१९ पासून त्यांची प्रकृती खालावली होती. ओमन चांडी यांना घशाचा आजार झाल्याने त्यांना उपचारासाठी जर्मनीला नेण्यात आले होते.

सलग १२ वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या
ओमन चांडी कोट्टायम जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पुथुपल्ली येथून निवडणूक लढवत होते. त्यांनी सलग १२ वेळा विधानसभा निवडणूक जिंकली. ते एक मास लीडर होते, तसेच, त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता.