“केवळ जाहिरातीच्या भरवशावर कुणीही घर घेऊ नये”, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं जनतेला आवाहन
राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे, तर काही भागात अद्यापही शेतीला आवश्यक प्रमाणात पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. इतकंच नाही, तर खतांची दरवाढ आणि बोगस बियाणांचाही प्रश्न समोर आला. अशातच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे अनेक आव्हानं निर्माण होत आहे. इर्शाळवाडीची घटना ताजी असताना राज्यातील इतर भागातही काही गावांना दरडीचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे.
आज सर्रास आपल्याला रेराची मान्यता असलेल्या जाहिराती दिसतात. मात्र, त्याला खरंच रेराची मान्यता आहे की नाही हे बघितलं पाहिजे. त्यामुळे माझं सामान्य जनतेला आवाहन आहे की, बिल्डरने रेराची मान्यता असं लिहिलं असलं तरी रेराच्या वेबसाईटवर ते तपासावं. रेराची वेबसाईट खूप सोपी आहे. सामान्य माणूसही ती सहजपणे वापरू शकतो. ती खात्री केल्याशिवाय केवळ जाहिरातीच्या भरवशावर कुणीही घर घेऊ नये.