महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

किशोर पाटलांकडून पत्रकाराला शिवीगाळ

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना अश्लील शिवीगाळ केल्याचं प्रकरण राज्यात चांगलंच गाजत आहे. त्यानंतर किशोर पाटील समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप पत्रकाराने केला आहे. याच प्रकरणावरून किशोर पाटील यांची बहीण आणि ठाकरे गटातील नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील एका गावातील पीडित मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाशी संवाद साधला. या विषयावर पाचोरा येथील स्थानिक पत्रकार संदीप महाजन या पत्रकाराने ‘मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी’ या आशयाखाली बातमी प्रसारित केली होती.

याच घटनेवरून आमदार किशोर पाटील आणि संबंधित पत्रकार यांच्याशी फोनवरून एकमेकांमध्ये संवाद झाला. याच संवादात बोलताना आमदार किशोर पाटील यांनी पत्रकाराला अश्लील शिवीगाळ केली असून हीच ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी ती ऑडिओ क्लिप माझीच आहे, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मी जे केलं ते सत्य सांगण्याची माझ्यामध्ये हिंमत आहे, असे म्हणत ‘घटने संदर्भात संबंधित पत्रकाराला गांभीर्य नसेल तर…. होय मी पत्रकाराला शिव्या दिल्या आहेत’ अशी सुद्धा कबुली दिली होती. या प्रकरणावरून आमदार किशोर पाटील यांच्यावर राज्यभरातून टीका होताना पाहायला मिळत आहे.

Advertisements
Advertisements

एखाद्या आमदाराने पत्रकारच काय पण जनतेतील कुठल्याही व्यक्तीशी अशा पद्धतीने बोलू नये. पाचोराचा राजकीय वारसा सुसंस्कृत आहे. यापूर्वीच्या नेत्यांनी तो कायम ठेवला आणि तो आताच्या नेत्यांनीही जपला पाहिजे. यापूर्वीही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य करत घाणेरडी भाषा वापरली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात इतक्या घाणेरड्या भाषेत कुणाला शिव्या दिल्या नाहीत. आणि याच प्रकरणावर बोलताना बाळासाहेबांचे नाव जोडणं योग्य नाही.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button