महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

गॅस दर वाढीवरून विरोधक आक्रमक

अर्थसंकल्पीय अधिवेशनचा तिसरा आठवडा सुरु आहे. सरकार विरोधात विरोधी पक्ष सतत आक्रमक होताना दिसत आहे. आज देखील विरोधी पक्षातील नेत्यांनी आणि आमदारांनी सरकार विरोधात आंदोलन केले.

आज विधानभवनाच्या पायर्‍यांवर चूल रचत त्याच्यावर प्रतिकात्मक सिलेंडर ठेवून गॅस दरवाढ आणि महागाईच मविआकडून निषेध करण्यात आला. या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय, खावटी अनुदान न देणार्‍या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले,बजेटमध्ये भोपळा देणार्‍या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button