परभणी पोलीसांची कोंबींग दरम्यान गांजा व 4.5 लाख रोख रक्कम जप्त
परभणी
विशेष
पोलीस अधीक्षक परभणी, श्रीमती रागसुधा आर. यांचे मार्गदर्शनाखाली परभणी शहरात कोबींग ऑपरेशन करून त्यामध्ये गांजा, अवैध दारू यावर रेड करण्यात आल्या.आज परभणी तसेच संशयास्पद रक्कम जप्त करण्यात आली.
दिनांक 31/01/2023 रोजी पोलीस अधीक्षक परभणी, श्रीमती रागसुधा आर, अपर
पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर तथा परभणी
ग्रामीण श्री. राजेंद्र शिरतोडे यांचे मार्गदशनाखाली परभणी शहरात स्थानिक गुन्हे, जिल्हा विशेष
शाखा, महिला सुरक्षा शाखा, अमानवी वाहतुक प्रतिबंधक पथक, पोलीस मुख्यालय, जलद प्रतिसादर
पथक, स्थानिक पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी परभणी शहरात संयूक्तरित्या
कोबींग ऑपरेशन राबवीले.
दरम्यान अवैध गांजा विक्री करणाऱ्या लोकांची माहिती काढत असतांना माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशन कोतवाली हद्दीत भिमनगर येथे आज परभणी राहणारी महिला व शेख रफीक शेख दस्तगीर शेख जावेद शेख दस्तगीर छापा मारला असता त्यांच्या जवळून जवळपास 49,000/- रुपयांचा 9.952 कि.ग्रॅ. गांजा जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन कोतवाली हद्दीत औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 185 चे कलम 8 (क), 20 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तसेच सदर ऑपरेशन दरम्यान आज परभणी अवैध गांजाचा शोध घेत असतांना माहिती मिळाल्यावरून इसम नामे शेख अमीर शेख ताहेर, रा. रमाबाई आंबेडकर नगर परभणी याचे घरझडती घेतली असता त्याचे त्याचे घरात लपवून ठेवलेले 4,58,400/- रुपये मिळून आले आज परभणी त्यास सदर पैशाचे मालकी हक्काबाबत विचारपूस करता त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही व उडवा उडवीचे उत्तरे दिली. सदर रक्कम त्यान घरी का बाळगली याचे निश्चीत कारण सांगीतले नाही. म्हणून म्हणनू त्याचे विरूध्द म.पो.अ. 1951 कलम 124 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
तसेच सदर कोंबींग ऑपरेशन दरम्यान एक प्रोव्हीबीशन रेड देखील केलेली आहे.
व सदर ऑपरेशन दरम्यान 6 हिस्ट्रीशीटर देखील चेक करण्यात आले.
जनसंपर्क अधिकारी,
पोलीस अधीक्षक कार्यालय, परभणी.