परभणीमराठवाड़ामुख्य बातमी

आमदार, खासदार ,कलेक्टर बांधावर, पालकमंत्री मात्र परभणीत ही येईनात

 

*शेतकऱ्यांना तातडीने मदत करा* आमदार पाटील यांची मागणी
टाकळी, नांदापुर शिवारात नुकसानीची पाहणी

परभणी,

परभणी विधानसभा मतदार संघातील टाकळी कुंभकर्ण व नांदापूर या शिवारात अवकाळी पाऊस गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केली. 24 तासाच्या आत शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी आमदार राहुल पाटील यांनी केली

Advertisements
Advertisements

 

परभणी जिल्हासह सर्व मराठवाड्यात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे,परभणी जिल्ह्यामध्ये दोन दिवसात तीन ते चार वेळा अवकाळी पाऊस झाला तसेच काही भागात गारपीट झाली.सोबत वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झालेआहे, सध्या रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा ही पिके काढनीला आलेली आहेत,अशा अवस्थेत शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. वादळी वाऱ्यामुळे गहू, ज्वारी ही पिके भुईसपाट झाली आहेत. तसेच संत्रा, मोसंबी,केळी, पेरू या फळबागांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे.परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण, नांदापुर,झरी या शिवारात शनिवारी वादळीवारासह पाऊस झाला, यामुळे तातडीने आमदार राहुल पाटील यांनी रविवारी नांदापूर,टाकळी या शिवारात महसूल प्रशासनाला सोबत घेत पाहणी केली. यावेळी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासमवेत प्रभारी तहसीलदार श्री चव्हाण शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख,संजय गाडगे, अरविंद देशमुख टाकळीचे सरपंच प्रभाकर जैस्वाल, नांदापूरचे सरपंच शरद रसाळ, नितीन देशमुख,बंडू नाना बिडकर व शेतकरी बांधव उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले आहे, अशावेळी शासनाने कुठलेही नियम न पाहता थेट पंचनामे करून मदत दिली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली
*आमदार मेघना दिदि बोर्डीकर यांनी हंडी,वझर,धमधम येथे गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.यावेळी तहसीलदारांना तत्काळ पंचनामे सुरू करण्याचा सूचना केल्या.यावेळी तहसीलदार अमित घाटगे,तलाठी,केशव घुले, वाल्मिकी टाकरस ,माऊली वटाने,कैलास खंदारे,शिवाजी मते ,भगवान मोरे,गोपीनाथ दांडगे,शेतकरी उपस्थित होते.

 

आमदार मेघना दिदि बोर्डीकर यांनी हंडी,वझर,धमधम येथे गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.यावेळी तहसीलदारांना तत्काळ पंचनामे सुरू करण्याचा सूचना केल्या.यावेळी तहसीलदार अमित घाटगे,तलाठी,केशव घुले, वाल्मिकी टाकरस ,माऊली वटाने,कैलास खंदारे,शिवाजी मते ,भगवान मोरे,गोपीनाथ दांडगे,शेतकरी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button