Uncategorizedमुख्य बातमी

पाथरीत राष्ट्रवादी अन् शिंदे गटात जोरदार सामना, बाबाजानी दुर्राणी आणि सईद खान यांचे एकमेकांवर गंभीर आरोप

पाथरीत राष्ट्रवादी अन् शिंदे गटात जुंपली, बाबाजानी दुर्राणी आणि सईद खान यांचे एकमेकांवर गंभीर आरोप

परभणी
विशेष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुरानी हे बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटामध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांनी माजी मंत्री तथा नेते अर्जुन खोतकर यांची 19 तारखेला जालन्यामध्ये भेट घेतली असा संस्था बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पाथरीतील नेते सईद खान यांनी आज पत्रकार परिषदेत केला त्याचवेळी बाबाजानी दुरानी यांच्यावर त्यांनी गंभीर  अनेक आरोपही केले या आरोपांची चौकशी करावी यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुरावी सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले
आमदार बाबाजानी विरुद्ध सईद खान असा सामना जोरदार रंगलेला असताना आज दोघांची एकाच दिवशी पत्रकार परिषद झाली…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये परभणी जिल्ह्यातील विशेषतः पाथरी तालुक्यातील माजी नगरसेवक आणि सरपंचांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या सरपंचांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला आहे असेही ते म्हणाले

Advertisements
Advertisements

राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि सईद खान यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केला आहे.
मागच्या काही दिवसांपासून परभणीत शिंदे गटामध्ये जाणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आणि यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि शिंदे गटाचे नेते सईद खान यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुन्हेगारांना शिंदे गटात प्रवेश देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे. तर दुसरीकडे बाबाजाणी यांच्यावरच 41 गुन्हे दाखल आहेत आणि तेच शिंदे गटात येण्यासाठी अर्जुन खोतकर यांना भेटून धडपड करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते तथा भावना गवळी यांच्याशी कथित ईडी घोटाळ्यात अटक करण्यात आलेले सईद खान यांनी मागच्या काही दिवसात जिल्ह्यातील आणि विशेषतः पाथरी येथील नगर परिषदेचे माजी सदस्य तसेच ग्राम पंचायतचे सरपंच यांना शिंदे गटात आणण्याचा धडाका लावलाय. यातील अनेक जण हे राष्ट्रवादी आणि बाबाजानी समर्थक असल्याने या प्रवेशावर आक्षेप घेत राष्ट्रवादीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष करत मुख्यमंत्री ईडीतील आरोपी तसेच वाळू माफिया आणि इतर गुन्हे असलेल्या लोकांना प्रवेश देत असल्याचा आरोप केला आहे.

तसेच आपण मुख्यमंत्र्यांना याबाबत भेटून सर्व सांगणार असल्याचे ही बाबाजानी दुर्राणी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले. यावर शिंदे गटाचे नेते सईद खान यांनीही पत्रकार परिषद घेत बाबाजानी आणि त्यांच्या कुटुंबावर एकूण गुन्हे दाखल असल्याची यादी दाखवली. बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरीत अनेक घोटाळे केले आहेत. त्याची चौकशी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले.

अर्जुन खोतकर यांना भेटून शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी धडपड करत आहेत असा आरोपही सईद खान यांनी या पत्रकार परिषदत केलाय. यामुळे शिंदे गटाचे नेते सईद खान आणि राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यातील संघर्ष वाढलाय

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button