गंगाखेड :प्रिभूषन नृत्य अकादमी च्या माध्यमातून परिसरात उत्तम कलावंत घडवण्याचे काम सतत सुरू असते. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. शहरात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचा पायंडा सुरू करून प्रिभूषन ने कला क्षेत्रात गंगाखेडकरांची मान ऊंचावली आहे, असे प्रतिपादन तालुका कॉंग्रेस तथा साईसेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी केले.
येथील पुजा मंगल कार्यालयात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा अतीशय ऊत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात गोविंद यादव प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे हे होते. पोदार लर्न स्कूल परळी वैद्यनाथचे सचिव बद्रिणारायान बाहेती, माजी नगरसेविका प्रतिमाताई वाघमारे, नाट्य दिग्दर्शक सुनिल ढवळे, नादबिंदूचे गोपी मुंडे सर, ॲड. लिंबाजी घोबाळे, डॉ.समीर गळाकाटू, प्रा. डॉ. शिवाजी गाडे, रिपाई चे दिलीप गांधरे, प्रा.डॉ. अंकुश वाघमारे, कलीम थेरकर सर, पत्रकार भागवत जालाले आदींची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. ऊपस्थित सर्व प्रमुखांनी संयोजक भूषन गाडे व त्यांच्या सहकार्यांचे कौतुक केले.
राज्यातल्या विविध भागांमधून आलेल्या १२० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. यात मोठ्या गटात प्रथम ज्योती गोरे, द्वितीय प्रदीप गुप्ता (मुंबई), तृतीय सोनू वाघमोडे ( अक्कलकोट), तर उतेजनार्थ आशिष ओस्कलवार ( नांदेड) यांनी यश संपादन केले. तर लहान गटात प्रथम माही घोडराव (बीड), द्वितीय मानवी पतंगे (आंबेजोगाई), तृतीय संजना बिरादार ( अक्कलकोट) उत्तेजनार्थ संध्या मुजमुले (माजलगाव बीड) यांनी विजय संपादन केला. प्रिभूषन अकादमीचे भूषन गाडे, सौ. प्रियंका आवचार-गाडे यांनी ऊपस्थितांसह स्पर्धकांचे स्वागत करत ऊत्कृष्ट संयोजन केले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. सिद्धार्थ मस्के, वर्षा जोशी, गंगा गवळी यांनी काम पाहिले. नागेश बोरीकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार भूषन गाडे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रमेश गायकवाड, प्रतीक खंदारे, प्रतीक घोबाळे, विकास वाघमारे प्रशांत खंदारे, विशाल उफाडे ,संदीप राठोड, कार्तिक खैरे, अजय अवचार, सुशांत धर्मेकर, कपिल भरणे, शेख जावेद, श्याम घोबाळे, विजय आवचार आदींनी परीश्रम घेतले.