Uncategorizedजगात जर्मनी

आमदार राहुल पाटील म्हणाले, आपल्याला कुणाची भीती नाही, मतदार विकासाला मत देणार

आमदार राहुल पाटील म्हणाले, आपल्याला कुणाची भीती नाही मतदार विकासाला मत देणार

*मतदार राजा सुज्ञ आहे, विकासाला मत देणार : आ डॉ. राहुल पाटील


परभणी : काही जण लोकशाहीचा घातक पद्धतीने दुरुपयोग करत जिंकण्यासाठी नव्हे तर चांगल्या उमेदवारांना पाडण्यासाठी उभे राहतात. परंतु मतदार राजा सुज्ञ आहे, मागील दहा वर्षात केलेली कामे पाहून विकासाला मत देणार आहेत असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले.
आ.डॉ.पाटील यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील युवासेना शाखाप्रमुख, विभाग प्रमुखांची आढावा बैठक पार पडली. यावेळी आ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले, माजी शहर प्रमुख अनिल डहाळे,युवासेना शहर प्रमुख बाळराजे तळेकर, विशू डहाळे, अमोल गायकवाड, महेश येरळकर, शे. असलम, शुभम हाके, शुभम सपकाळ आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की, आपण दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांसमोर जाणार आहोत. त्यामुळे आपल्याला कुणाची भीती नाही, दहा वर्षात केलेली विकास कामे आपल्याला निवडून देणार यात तिळमात्र शंका नाही. लोकशाहीचा दुरुपयोग करत काहीजण चांगले उमेदवार पाडण्यासाठी उभे राहतात. कोणी कितीही आटापिटा केला तरी जनता सुज्ञ आहे. परभणी विधानसभा मतदारसंघातील जनतेने आतापर्यंत हे दाखवून दिले आहे.
शिवसेना, युवा सेना कार्यकर्ते दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार यात शंका नाही. सध्या आपल्या कार्यकाळात झालेली विकास कामे पाहून विविध पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेना, युवासेनेत येत आहेत. ही आपल्या कामाची पावती आहे असे आ. पाटील यांनी सांगितले. यावेळी डॉ.नांवदर म्हणाले, निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रचार यंत्रणा दरम्यान विविध टप्पे आहेत. शनिवार बाजार मैदान येथून महारॅली काढून उमेदवारी अर्ज हजारो जनतेच्या साक्षीने भरणार आहोत असे  डॉ.नांवदर यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी गणेश मुळे, केदार दुधारे, सतिश फटके, धनराज चव्हाण, कपील मकरंद, राहूल जैस्वाल आदीसह युवासेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button